संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यातील तरोडी-बिडगाव MDR 42 रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले असून रस्त्यांवरून दळणवळण करीत असताना अनेक अपघात होत आहेत. जीवघेणी परिस्थिती या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे निर्माण झालेली आहे. आज शनिवार 26/08/2023 ला प्रा.अवंतिका रमेश लेकुरवाळे सभापती महिला व बालकल्याण समिती जि.प. नागपूर यांच्या नेतृत्वामध्ये स्थानिक जनप्रतिनिधींनी खड्यांची शांती करुण झोपलेल्या सरकारला जागे करून रस्त्याचे काम करण्याची सुद्बुद्धी मिळावी म्हणून आंदोलन करण्यात आले. दोन दिवसाचा निर्वाणीचा इशारा दिला दोन दिवसात रस्त्यावरील खड्डे बुजविले गेले नाही तर प्रशासनाची प्रेतयात्रा आंदोलन करण्यात येईल अशा इशारा प्रा. अवंतिका रमेश लेकुरवाळे यांनी दिला. प्रसंगी उपस्थित आशिष मल्लेवार माजी उपसभापती तथा सदस्य पं.स. कामठी, अतुल बाळबुधे सरपंच केम, राजू राहंगडाले, महेश केसरवाणी, सतीश बरडे, ईश्वर जाधव, विलास गावंडे, अश्वजीत रामटेके, सचिन चिकटे, सचिन लांभाडे, जितेंद्र वैद्य, शीला लाटकर, प्रीयांषु वाहेकर, आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.