– सक्करदरा पोलीसांची कामगिरी
नागपूर :- दिनांक २१.०८.२०२३ ला पो. ठाणे सक्करदरा येथील विट मार्शल तसेच अधिकारी व अंमलदार हे पो. ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना रेशीमबाग, धाराशिवकर बिल्डींग जवळ, एक अक्टिवा व अॅक्सेस असे दोन गाडी वरील २ इसमावर संशय आले त्यावरून त्यांना त्यांचे जवळ अंमली पदार्थ असल्याचा संशय असल्याचे सांगुन पंचासमक्ष एनडीपीएस कायदयाचे पालन करून त्याची पंचासह झडती घेतली. आरोपी क. १) प्रियाशु दिनेश बाहरे वय १९ वर्ष रा. सिरसपेठ, स्वीपर कॉलोनी ईमामबाडा याचे अंगझडतीत शर्टचे खिश्यात प्रेस लॉक पनी मध्ये पांढरा रंगाची पावडर दिसून आली. नमुद पावडर बाबत त्याला विचारले असता त्याने ती एम.डी, इस पावडर असल्याचे सांगितले, त्याचे जवळुन १) ०२ ग्रॅम एम.डी. (मफेदान), ड्रग सदृश पावडर कि. अं.. २०,०००/- रु २) एक मोबाईल कि अ. २०,०००/- रु ३) विना नंबर व नोंदणी असलेली अॅक्टीव्हा कि अं.. ५०,०००/- असा एकूण ९०,०००/- रु चा मुद्देमाल मिळुन आला. तसेच आरोपी क. २) अर्पन अमीत मडावी वय २३ वर्ष रा नंदनवन झोपडपट्टी, गल्ली नं. ३, नंदनवन याचे अंगझडतीत उजवे पॅन्टचे खिश्यात ०६ प्रेस लॉक पत्नी मध्ये पांडऱ्या रंगाची पावडर दिसून आला त्याचे जवळून १) ०३ अँम एम.डी. (नफेड्रन), ड्रग सदृश पावडर कि. अं. ३०,०००/- रु २) एक मोबाईल कि अ. ३०,०००/- रु ३) सुझुकी अॅक्सेस गाडी एम.एच ४० बि.क्यू ४७२० कि. अ. ३०,०००/- रु असा एकूण ९०,००० /- रु चा मुद्देमाल मिळून आला. दोन्ही आरोपीचे ताब्यातून एकुण १,८०,०००/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरूध्द पो ठाणे सक्करदरा येथे कलम ८(क), २२(ब). २९. एन. डी. पी. एस अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस नमुद गुन्हयात अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे. वरील कामगिरी पोलीस उपआयुक्त परि ४, नागपूर, सहा. पोलीस आयुक्त, सक्करदरा विभाग, नागपूर शहर यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि अनील ताकसांडे, पोउपनि मोहुर्ले नापोअ नरेश लिखार, राहुल कळंबे पीअ दिपक नाईक व अमोल भालेराव यांनी केली.