कन्हान :- लोधी समाज कन्हान, पिपरीव्दारे राणी अवंतीबाई लोधी यांची १९२ वी जयंती निमित्य रानी अवंतीबाई लोधी रोड पिपरी आणि नागपुर जबलपुर महामार्गावर तारसा रोड चौक कन्हान येथे डी.जे. च्या स्वरात इतिहास आल्हा जीवनी गीत गायना सह महाप्रसाद वितरण करून जयंती उत्साहाने थाटात साजरी करण्यात आली.
ई.स.१८५७ च्या प्रथम स्वातंत्र संग्राम प्रणेता मध्य भारतातील रानी रामगढ़, विरांगना राणी अवंती बाई लोधी यांची १९२ वी जयंती निमित्य लोधी समाज कन्हान-पिपरी व्दारे रानी अवंतीबाई लोधी रोड पिपरी आणि नागपुर जबलपुर महामार्ग तारसा रोड चौक कन्हान येथे डॉ सेवकराम बिलोने, मूलचंद शिंदेकर, श्रवण वतेकर, उमेश आकोने, इंद्रपाल बेलेकर, केसरी पटेल, तुलसीराम खंगारे, भगवान निबोने, सीताराम दमाहे, महादेव लिलारे, इंद्रपाल लोधी, विट्ठल क्षत्रिय, नारायन रच्छोरे, ब्रिजलाल डहारे, कुसुम बेलेकर, रेवती लोधी, केसर सरीले, दमाहे, कोमल वतेकर, बबली छानीकर आदी मान्यवरांच्या हस्ते राणी अवंतीबाई लोधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलित करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
कार्यक्रमास उपस्थित सर्व लोधी समाज बांधवानी राणी अवंतीबाई लोधी यांचा प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करून डी.जे. च्या स्वरात इतिहास आल्हा जीवनी गीत गायना सह महाप्रसाद वितरण करून जयंती थाटात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सर्वश्री दामोदर नीबोने, मोहित वतेकर, अमर रछोरे, लोकेश दमाहे, जगदीश मेहुने, रंजित शिंदेकर, गेंदलाल वतेकर, महावीर खंगारें, सुंदर पटेल, मोहन रच्छोरे, नरेन्द्र सोलंकी, महेश क्षत्रिय, विलास लिलारे, बाला खंगारे, गेंदलाल निबोने, प्रज्वल वतेकर, निहार लोधी, किरण ठाकुर, आदित्य रच्छोरे, मोहन पटेल, विष्णु निबोने, प्रतिक वतेकर, अर्चना लोधी, शोभा वतेकर सह लोधी समाज कन्हान-पिपरी च्या पदाधिकारी, सदस्यानी परिश्रम घेतले.