गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयांत आनंदाचा शिधा

नागपूर :- राज्यातील शिधापत्रिकाधारकांना गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेल असा हा शिधा अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील (एपीएल) व केशरी शिधापत्रिकाधारकांना देण्यात येईल. हा शिधा जिन्नस १९ सप्टेंबर रोजी गौरी गणपती उत्सवानिमित्त व त्यानंतर १२ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या दिवाळी निमित्त वितरित करण्यात येईल.

राज्यातील एकूण १ कोटी ६५ लाख ६० हजार २५६ शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळेल. या खरेदीसाठी घाऊक बाजारातील दर व अनुषंगिक खर्चासह ८२७ कोटी ३५ लाख इतक्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आली. प्रती संच २३९ रुपये या दराने हा शिधा जिन्नस संच खरेदी करण्याचे प्रस्तावित आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या आरोपीताविरुद्ध गुन्हा नोंद

Sat Aug 19 , 2023
कुही :- अंतर्गत २५ कि. मी. अंतरावरील मौजा चांपा येथे दिनांक १७/०८/२०२३ चे ०७.०० वा. ते ०७.३० वा. दरम्यान कुही पोलीस पथक पेट्रोलीग करीत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, काही इसम विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने कोडुन वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहिती वरून कुही पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी जावून नाकाबंदी करुन मुखबीरदारे मिळालेल्या खबरेवरून वाहन क्र. एम. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com