संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-आठ दिवसानंतर ठरणार भाजप चा नवीन शहराध्यक्ष
कामठी :- काल मंगळवार ला कामठी येथील भागूबाई सभागृह येथे भाजपा कामठी अध्यक्ष निवड साठी बैठक पार पाडली . या बैठकीत अध्यक्ष पदा साठी 14 नाव आली त्यातील 4 नी नाव परत घेतले. यातील 10 नावातून एकाचे नाव शहराध्यक्ष पदासाठी आठ दिवसानंतर जाहीर करण्यात येईल.
लाला खंडेलवाल, पंकज वर्मा, संगीता अग्रवाल ,गायत्री यादव, प्रभा राऊत, राजा देशमुख, पुष्पराज मेश्राम, उज्वल रायबोले, राज हाड़ोती , संजय कनोजिया, कपिल गायधने, लालसिंग यादव, सुनील खानवानी, रंजना कश्यप यांनी अर्ज सादर केले असून यातील चार जणांनी अध्यक्षपदासाठी माघार घेतले असले तरी आठ दिवसानी अध्यक्ष जाहीर होणार आहे .ही बैठक भाजपा कामठी शहर अध्यक्ष संजय कानोजिया, सह ,मंडळातील अध्यक्ष निवडणुकीच्या संदर्भात घेण्यात आली.
या बैठकीला आमदार टेकचंद सावरकर,निवडणूक प्रमुख अजय बोढारे भाजपा नागपुर जिल्हा ग्रामीण) महामंत्री अनिल निधान ,डॉ संदीप कश्यप ,लाला खंडेलवाल उपस्थित होते.
तरी सदर बैठकीला भाजपा कामठी मंडळातील सर्व जिल्हा पदाधिकारी,तालुका पदाधिकारी ,बूथ प्रमुख,शक्ती केंद्र प्रमुख,प्रभारी,आघाडी,मोर्चा अध्यक्ष,नगरसेवक , सर्व पदाधिकारी वेळेवर उपस्थित होते.तर अध्यक्षपदासाठीं उज्वल रायबोले, लाला खंडेलवाल,पंकज वर्मा,राज हाडोती यांच्या नावाची चर्चा रंगत आहे तेव्हा भाजप चा कामठी शहर अध्यक्षाचा नवीन चेहरा कोणाचा राहील?याकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे.