प्रा. हरी नरके यांच्या निधनाने ओबीसी, परिवर्तनवादी चळवळीतील बुद्धिवादी व्यक्तिमत्व हरपले – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई :- “ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांच्या निधनाने महात्मा ज्योतीबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर श्रद्धा असलेला, ओबीसी हक्कांसाठीच्या चळवळीत आघाडीवर राहून लढणारा कृतीशील कार्यकर्ता आपण गमावला आहे. ते सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक, परखड भाष्यकार होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या साहित्याचे अभ्यासक, संशोधक, व्याख्याते ही त्यांची ओळख होती. तत्कालिन पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले होते. प्रा. हरी नरके यांनी अनेक शासकीय समित्यांवर तज्ज्ञ सदस्य म्हणून काम केले आहे. त्यांच्या निधनानं दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांची बाजू हिरिरीने मांडणारे, ओबीसी चळवळीला वाहून घेतलेले बुद्धिवादी व्यक्तिमत्व हरपले आहे. त्यांचे निधन ही महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक, परिवर्तनवादी चळवळीची हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यानी प्रा. हरी नरके यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एक मुल - एक झाड उपक्रमाद्वारे मनपाचे वसुधा वंदन, झाडांचे संगोपन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षिसे

Wed Aug 9 , 2023
चंद्रपूर :- आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने एक मुल – एक झाड उपक्रम चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे राबविल्या जात असुन या उपक्रमाद्वारे वसुधेस वंदन केल्या जाणार आहे. मेरी मिट्टी मेरा देश व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत शहरातील पर्यावरण रक्षण तसेच सौंदर्यीकरण व सुशोभीकरण करण्याच्या दृष्टीकोनातुन ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान मनपाद्वारे हा उपक्रम राबविला जाणार असुन शहरातील सर्व शाळांमध्ये तसेच विविध रस्त्यालगत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com