औषधीयुक्त रोपांचे वृक्षारोपण पतंजली योग परिवार भंडारा व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम संपन्न

भंडारा :- आजच्या युगाचे धन्वंतरी आयुर्वेद शिरोमणी श्रध्येय आचार्य बालकृष्ण महाराज यांचा जन्मदिवस पतंजली योग परिवार भंडारा व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ऑफिसर क्लब येथे नुकताच राष्ट्रीय जड़ीबूटी दिवस म्हणून साजरा करण्यात आला.

हा कार्यक्रम निवासी उपजिल्हाधिकारी लीना फालके यांच्या अध्यक्षतेखाली सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मनकर,भारत स्वाभिमान न्यास जिल्हा प्रभारी डॉ. रमेश खोबरागड़े, पतंजली योग समिति जिल्हा प्रभारी रत्नाकर तिडके, किसान सेवा समिति जिल्हा प्रभारी सुरेश घोड़े भारत स्वाभिमान महामंत्री यशवंत बीरे पतंजलि योग समिति सह प्रभारी भोजराम झंझाड यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रमेश खोब्रागडे यांनी केले. त्यांनी श्रध्येय आचार्यश्रीच्या जीवन कार्याची विस्तृत माहिती दिली व पतंजलीचे कार्य विषद केले. डॉ संजय मानकर यांनी आदर्श दिनचर्या व ऋतूचर्या तसेच दैनंदीन जीवनात योग व आयुर्वेद यांचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानाहून बोलताना लीना फालके म्हणाल्या की योग, आयुर्वेद व जडिबुटीचा वापर जर दैनंदिन आयुष्यात केला.

तर मोठया रोग-व्याधीपासून दूर राहू शकतो.आयुर्वेद व त्यातील उपचार हे दीर्घकाळाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.डॉ संजय मानकर व डॉ रमेश खोब्रागडे यांनी उपस्थितांना जडिबुटीचे गुणधर्म व वापर याबद्दलची माहिती देऊन तिथींच्या हस्ते त्यांचे वाटप करण्यात आले. यानंतर शासकीय धान्य गोडाऊन येथे जडीबुटी उद्यानाचे उदघाटन श्रीमती लीना फालके यांचे हस्ते करून औषधीयुक्त रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.

या वृक्षारोपणामध्ये आवळा, बेहडा, जांभूळ, निम, करंज,पिंपळ, शतावर, अश्वगंधा, कोरफड, सर्पगंधा, शंकरजटा, निर्गुंडी, पारिजात, खंडूचक्का, तुळस, गूळवेल, साग इत्यादीचा समावेश होता. कार्यक्रमाचे संचालन रमेश बारबुदे यांनी केले तर आभार प्रदर्शन रत्नाकर तिडके यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेकरिता अरुण भेदे, डेविड गुरव, मधुसूदन चवडे, भुनेश्वर मोरे, कृष्णा आकरे, निमेश गेडाम, सोनटक्के, मून, आनंद पडोळे, पुरवठा निरीक्षक, अशोक गायधने व गोडाऊन कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे ‘अभिव्यक्ती मताची’ स्पर्धेचे आयोजन

Mon Aug 7 , 2023
– वृत्तपत्रविदया आणि कला महाविदयालयांच्या सहभागी होण्याचे आवाहन भंडारा :- सर्वसामान्य जनतेत मतदानाबाबत जनजागृती करणे आणि विद्यार्थ्यांमधील नवनवीन संकल्पना आणि सर्जनशीलतेचा उपयोग मतदार जागृतीसाठी व्हावा या उद्देशाने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे ‘अभिव्यक्ती मताची’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचा कालावधी १ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२३ हा असून या स्पर्धामध्ये महाराष्ट्रातील जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या (मास मीडिया व जर्नालिजम) महाविद्यालये […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!