नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवार (ता.04) 8 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 55 हजार रुपयांचा दंड वसूल केला. लक्ष्मीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे जितेन्द्र ठाकरे, नेहरू नगर, वर्धा रोड, नागपूर व वसंता मांगे, विठ्ठल मंदीर जवळ, देव नगर, नागपूर यांच्यावर सी आणि डी कचरा फूटपाथवर अनधिकृतपणे टाकल्याबद्दल कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. थ्री बेन्स कॅाफी बार, गोरेवाडा, नागपूर, यांच्यावर हॉटेलचा कचरा अनधिकृत जागेवर टाकल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मे. दास ज्वेलर्स, अंबाझरी, नागपूर व मे. गायडन्स पॉइंट, गजानंद सोसायटी, दत्तवाडी, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत प्रत्येक 5 हजार दंड वसूल करण्यात आला. हनुमान नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. आराध्या इंन्टरप्राईजेस, बुधवार बाजार परिसर, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. बडवाईक बिल्डर्स, वंजारी नगर, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मंगळवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. अरोमार्स, पार्लर, बेझनबाग, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत प्रत्येक 5 हजार दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.