संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या त्रिमुर्ती नगर,रणाळा रहिवासी व कामठी नगर परिषद चे माजी नगरसेवक सुरेश पाटील यांच्या एकुलत्या एक मुलाने अज्ञात कारणावरून राहत्या घरातील खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे 4 वाजता निदर्शनास आली असून आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव विकास सुरेश पाटील वय 24 वर्षे रा. रणाळा कामठी असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक तरुणाने अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी एम बी ए करण्याच्या बेतात होता.मात्र गतरात्री घरमंडळी गाढ झोपेत असल्याचे संधी साधून सदर तरुणाने अज्ञात कारणावरुन राहत्या घरातील खोलीत सिलिंग पंख्याला साडी ने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मृतकाची आई ला निदर्शनास आली असता सर्वाना एकच धक्का बसला आत्महत्येचे कारण अजूनही कळू शकले नाही.
घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालयाच्या शवगृहात हलविण्यात आले. पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असुन पुढील तपास सुरू आहे.