संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- येथील गौतम नगर भागातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध पुतळा परिसरात नगर परिषदद्वारे प्रस्तावित असलेला आर ओ प्लांट दुसरीकडे स्थलांतरीत करावा अश्या मागणीचे निवेदन भाजपा कामठी शहर महामंत्री उज्वल रायबोले यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मुख्याधिकारी संदीप बोरकर यांना आज दुपारी सोपविले, निवेदनावर जवळपास 40 स्थानिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
गौतम नगरात विविध धार्मिक,सामाजिक आणि इतर कार्यक्रम घेण्यासाठी ही एकमेव जागा आहे, आर ओ प्लांट उभारल्यास जागा राहणार नाही शिवाय दोन आर ओ प्लांट देखभाल दुरुस्ती अभावी बंद पडले आहेत याकडे उज्वल रायबोले यांनी मुख्याधिकारी बोरकर यांचे लक्ष वेधले
शिष्टमंडळात भाजपा कामठी शहर महामंत्री उज्वल रायबोले तसेच अविनाश गजभिये, माधुरी गजबे,ज्योती नागदेवे, अश्विन बावनगड़े, सुबोध चांदोरकर,गणेश डांगे,छाया वानखेड़े, भारती मेश्राम यांचा समावेश होता