नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवार (ता.19) 07 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 40 हजार रुपयांचा दंड वसूल केला. धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. चिमठानवाला ऑर्थोपेडीक हॉस्पीटल, सिताबर्डी, नागपूर यांच्यावर औषधाच्या रिकाम्या बाटल्या जवळपासच्या परिसरात टाकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. व मे. वरीना रियलिटीस, आकांशा सोसायटी, दाभा, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
हनुमान नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. इनक्रेडीबल किडस दि प्ले स्कुल, मानेवाडा नागपूर व मे. परंपरा नॅचुरलर्स, न्यु ओमकार नगर, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. जय हरे क्रिष्णा, कॉटन मार्केट, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. राधेश्याम किराणा स्टोर्स, गांजाखेत, इतवारी, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. सतरंजीपुरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. पौनिकर किराणा शॉप, राणी दुर्गावती चौक, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.