नागपूर:- मैत्रेय शैक्षणिक संस्था द्वारा संचालित नागार्जूना इन्स्टीटयूट ऑफ इंजिनिअरींग टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, सातनवरी, नागपूर येथे दि.१५ जुलै रोजी बॉक्स कल्व्हर्ट पुलाचे उद्घाटन इंजि.निखिल मेश्राम (आयुक्त IRS, वित्त मंत्रालय, भारत सरकार) व अनावरण इंजि.के.एस.जांगडे (माजीसचिव सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी मैत्रेय शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष इंजि. मदन माटे, सचिव मा.अजय वाघमारे, डी.जी.बनकर (माजी अध्यक्ष,एम.ई. एस.) ताकसांडे (माजी मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र सरकार), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय केलो व उपप्राचार्य डॉ. मुरलीधर रहांगडाले व कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.संदिप ठाकरे उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय केलो यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात पुल निर्मिती पूर्वीची व निर्माण कार्या दरम्यान घडलेल्या विविध अनुभवां विषयी विस्तृत माहिती दिली. ततपश्चात भिमटे (कंत्राटदार), प्रा.जयेश तांदुळकर व प्रा. शुभम इंगोले (पर्यवेक्षक) यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे विशेष अतिथी इंजि.के.एस.जांगडे यांनी महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकास कार्यतील अमुलाग्र व उल्लेखनीय बदला करीता महाविद्यालयाला शुभेच्छा दिल्या व महाविद्यालयाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो अशी आशा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष इंजि.निखिल मेश्राम यांनी सातनवरीतील नैसर्गिक प्रवाहाचे नागार्जुना अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे संवर्धन केल्याबद्दल त्यांनीं सर्वांचे कौतुक केले. त्याचबरोबर दिवसेंदिवस विविध प्रकारच्या उपक्रमांन द्वारे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील आपली बांधीलकी कशाप्रकारे हे महाविद्यालय पूर्ण करण्याकरीता प्रयत्नशील आहे याविषयी आनंद व्यक्त केला. महाविद्यालयात दिवसेंदिवस होणाऱ्या विविध उपक्रमांची जसेकी मेगा प्लेसमेंट ड्राईव्ह, इंटरनॅशनल कॉन्फरन्स, इंडस्ट्री ऍकॅडमीया समिट व फ़ॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम अश्या स्तुत्य उपक्रम यशस्वी रीतीने पार पडल्याबद्दल विशेष कौतुक त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.
इंजि.मदन माटे यांनी सर्वांनीं प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या या कार्याशी निगडीत असलेल्या सर्वांचे अभिनंदन केले. सर्वांनी एकत्रित पणे घेतलेल्या परिश्रमा करीता सर्वांची दाद दिली. महाविद्यालयाच्या उत्तरोत्तर प्रगती करीता भविष्यात अशीच एकजुटीने प्रयत्न करतील अशी आशा व्यक्त केली. श्री. भिमटे (कंत्राटदार) यांनी पूलाच्या निर्माण कार्यात आलेले स्वानुभव सांगितले. प्रा. जयेश तांदुळकर (पर्यवेक्षक) यांनी पूल निर्मितीच्या कालावधीत त्यांना आलेल्या अडीअडचणीं बद्द्ल व त्यावर कश्या प्रकारे मात करून कार्य पूर्णत्वास नेले याचे वर्णनं केले. वेळोवेळी महाविद्यालयातील व्यवस्थापन मंडळ व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या सहकाऱ्या करीता त्यांचे विशेष आभार मानले. डॉ.एस.एस.खान, प्रा.अतुल आकोटकर, प्रा.अमित मेश्राम, प्रा.बिना रेवतकर, प्रा.प्रिया फरकडे, डॉ.योगेश बैस, प्रा.संजय बनकर, प्रा. मनिष थुल, प्रा.अश्विनी वालदे, प्रा.कुशल यादव, प्रा.वृशाली पाराये, प्रा.आतिफ नवाब, प्रा.शुभम इंगोले, प्रा.जयेश तांदुळकर, डॉ.जयगोपाल अंबादे, प्रा.सचिन मते, प्रा.चार्ली फुलझेले, डॉ. मोईन देशमुख, प्रा.मयूर मालते, प्रा.सुधीर गोवर्धन, प्रा.वैष्णवी बोपचे आणि नम्रता नाईक यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. संचालन प्रा.फजेला फिरोज यांनी केले तर आभार प्रा.कल्याणी फुलझेले यांनी मानले.