– लोकसंख्या स्थिरता पंधरवाडा चे औचित्य
रामटेक :- जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्त साधून तथा लोकसंख्या स्थिरता पंधरवाडा निमित्त ला प्राथमिक आरोग्य केन्द्र हिवरा बाजार आणी प्रा.आ. केंद्र करवाही यांच्या संयुक्त विघमाने हिवरा बाजार येथे तर प्राथमिक आ.केन्द्र भंडारबोडी, नगरधन व मनसर द्वारे दि.२० जुलै ला मनसर येथे पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराच्या तालुक्यातील सर्व पुरुष मंडळीनी लाभ घ्यावा,असे आवाहन तालुका वैघकिय अधिकारी डाँ.चेतन नाईकवार तथा सर्व प्रा.आ. केन्दाचे सर्व डाँक्टर अधिकार्यांनी केले आहे.