विशेष चिमुकल्यांचा नृत्याविष्कार बघून भारावले प्रेक्षक

– दिव्यांग मुलांच्या ग्रीष्मकालीन शिबीराचा समारोप

– टाळ्यांच्या गडगडाटाने दुमदुमले सुरेश भट सभागृह 

नागपूर :- प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याने उंच आकाशात भरारी घ्यावी, हवेत यश संपादन करावे असे वाटत असते. त्याकरिता मुलांचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे. याच उद्देशाने नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत समग्र शिक्षा-समावेशित शिक्षण या उपक्रमांतर्गत दिव्यांग मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत असलेल्या व शाळाबाहय दिव्यांग मुलांकरिता ग्रीष्मकालीन शिबिराचे आयोजन करण्यात आले. रेशीमबाग स्थित कविवर्य सुरेश भट सभागृहात या शिबिराचा समारोप करण्यात आला. यावेळी विशेष मुलांचा नृत्याविष्कार, नाटक, संगीत सादरीकरण बघून उपस्थित प्रेक्षक भारावून गेले. या विशेष मुलांनी आपले बहारदार नृत्ये सादर करीत उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांच्या पत्नी संथी राधाकृष्णन बी. यांनी भूषविले. याप्रसंगी राज्य महिला आयोग सदस्य आभा पांडे, मनपाचे शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर, दिव्यांग कल्याण समितीचे सदस्य दिनेश यादव, हर्षलता बुराडे, मनपाचे उपशिक्षण अधिकारी उपासे, सहायक प्रकल्प अधिकारी  धनलाल चौलीवार, अभिजीत राऊत यांच्यासह इतर मान्यवर व पालक प्रामुख्याने उपस्थित होते.

दिव्यांग मुलांचे ग्रीष्मकालीन शिबिर समारोपीय कार्यक्रमात दिव्यांग विद्यार्थ्यांनी 15 ते 16 विविध विषयावर सादरीकरण केले. यात सामुहिक नृत्य, सामुहिक गायन, स्वागत गीत, एकल नृत्य, एकल गीत, पालकांचे मनोगत, पालकांचे नृत्य तसेच समावेशित शिक्षण कर्मचारी यांचे विद्यार्थ्यांना समर्पित नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी टाळ्यांचा गडगडाटाने संपूर्ण सभागृह दुमदुमल्याचे दिसून आले.

मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात विशेष गरजा असणाऱ्या मुलांना शिक्षणाबरोबरच संगीत, नृत्य नाटय सांस्कृतिक कला व क्रिडा क्षेत्रात सुध्दा समान संधी प्राप्त व्हावी यासाठी त्यांच्या सुप्त कलागुणांना चालना मिळणे त्याकरीता दिनांक ०९ मे ते १९ जून यादरम्यान ग्रीष्मकालीन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांसह पालकांनीही शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सर्वांचा उत्साह वाढविला. दिव्यांग विद्यार्थी तर शिबीरात इतके रमले आहेत की, घरी जायला तयार नाही. शिबीरामुळे दिव्यांग विद्यार्थ्याच्या सुप्त गुणांना वाव तर मिळाला, पण सोबतच त्यांचा Self Confidence, Socialization, Communication, Concentration, Vocational, Eye-Hand Coordination, Entertainment इ. गुणांमध्ये विकास होण्यास मदत होत आहे. तसेच मानसोपचार तज्ज्ञां मार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांचे वर्तणूक समस्येचे निवारण व व्यवस्थापन आणि Good Touch, Bad Touch याची जाणीव, अतितीव्र दिव्यांग विद्यार्थ्यांना फिजीओथेरेपीस्ट तज्ज्ञांमार्फत फिजीओथेरेपी देण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘वैश्विक हिन्दू राष्ट्र महोत्सव’ में 725 हिन्दुत्वनिष्ठों का उत्स्फूर्त सहभाग !

Thu Jun 22 , 2023
– 1 हजार मंदिरों में वस्त्रसंहिता; जबकि पूरे वर्ष तक ‘लव जिहाद’ के विरुद्ध अभियान चलाएंगे ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे गोवा :- महाराष्ट्र मंदिर महासंघ की ओर से महाराष्ट्र के 131 मंदिरों में वस्त्रसंहिता लागू होने पर अब कर्नाटक, छत्तीसगढ, देहली, उत्तर प्रदेश आदि अनेक राज्यों में भी ‘मंदिर महासंघ’ की स्थापना करने की मांग आई है । […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com