नागपूर दि.31 : राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. 4, नागपूर येथे वर्ग 4 कर्मचारी भरती 2022 मध्ये भोजन सेवकाची आठ पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. 31 जानेवारीला उमेदवारांना परीक्षा व मूळ प्रमाणपत्र तपासणी करीता प्रत्यक्ष हजर राहण्याबाबत कळविण्यात आले होते. मात्र, प्रशासकीय कारणास्तव या तारखेवर ही भरती होऊ शकली नाही. भरतीची नवीन तारीख जाहीर केली जाईल व उमेदवारांना त्या तारखेस हजर राहायचे आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक डी. बी. ताम्हणे यांनी दिली. नवीन तारीख राज्य राखीव पोलीस बलाच्या https://www.maharashtrasrpf.gov.in या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल, असे राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. 4 चे समादेशक पंकज डहाणे यांनी कळविले आहे.
राज्य राखीव पोलीस बल भरती प्रक्रीया पुढे ढकलली
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com