कोदामेंढी :- येथून जवळच असलेल्या गट ग्रा. पं. अंतर्गत अड़ेगाव व कथालाबोड़ी या दोन गावांचा समावेश आहे. शासनाने प्रत्येक गावाला समृद्ध करन्यासाठी महात्मा गाँधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत अनेक नविन कामाँचा समावेश केला आहे. मात्र योजनेच्या जाचक अटी पाहता, मौदा तालुक्यातील अनेक गावात फारच कमी कामे सुरु आहेत, तर कुठे संपूर्ण बंद पडलेले आहेत. मात्र याला अपवाद वगळता तालुक्यातील 63 ग्रा. पं मधून गट ग्रा. पं. अड़ेगाव रोहयो ची अनेक कामे व नवनविन कामे राबविनारी एकमेव ग्रा. पं. ठरली आहे. मागील चार वर्षापासून ग्रा. पं. अंतर्गत व रोहयो अंतर्गत येणारी कामे मोठ्या प्रमाणात राबवून गट ग्रा. पं. अड़ेगाव ला समृद्धिच्या मार्गावर आनल्याचे सरपंच जोगेंद्र वसनिक यांनी सांगितले.
रोहयोच्या माध्यमातून 30 लक्ष रुपयाचे सीमेंट रस्ते, पांधन रस्ते बांधकाम व 5 हजार फळझाडे लाउन संपूर्ण गावतील मजूरवर्गाला आळीपाळीने रोजगार,वैक्तिक वृक्षलागवड़, सिंचन विहिरी,कॅटल व गोट शेड, शोष खड्डे व शेतकऱ्याच्या बांध्यान्ना समतल करणारी योजना “भातखचऱ्या”फक्त अड़ेगाव गट ग्रा. पं. मधे राबविण्यात आली, हे विशेष. मातोश्री पांधन योजनेतून तीन पांधन रस्त्याचे 60 लक्ष रुपये निधिचे खड़िकरणाची इ टेंडर प्रकियाही सुरु असून ग्रा. पं. च्या इतर योजने तूनही दोन्ही गावात सीमेंट रस्ते, भूमिगत नाल्या, शाळा व आँगनवाड्या डिजिटल झाल्या आहेत. जलजीवन मिशन अंतर्गत मागच्या वर्षी कथलाबोड़ी येथे 14 लक्ष रुपयाचे पानीपुरवठ्याचे कामे झाली, तर या वर्षी 78 लक्ष रुपये मंजूर झाले आहेत. गट ग्रा. पं. अड़ेगाव ला समृद्ध करण्यासाठी सरपंच जोगेंद्र वासनिक यांना उपसरपंच शिवशंकर दिवटे, ग्रामसेवक जयन्द्र सोलंकी, ग्रामरोजगार सेवक प्रशांत खेड़िकर समेत समस्त ग्रा. पं. सदस्यगन व ग्रामवासी सहकार्य करत आहे.