मोतीराम व्ही रहाटे, प्रतिनिधी
कन्हान : – सुरेंद्रगढ नागपुर येथील गोंड लोक वस्ती मध्ये अचानक मोर आढळल्याने तेथील लोकांनी वन विभाग व वाइल्ड अनिमल अँण्ड नैचर रेस्क्यु संस्थेला माहीती देताच त्वरित पोहचुन जंगली मोराला ताब्यात घेऊन सुखरूप वन विभाग नागपुर येथील टी टी सी सेंटर च्या स्वाधिन करून मोराला जिवनदान दिले.
मंगळवार (दि.१६) मे ला दुपारी दोन ते अडीच वाजता दरम्यान सुरेंद्रगढ नागपुर येथील गोंड लोक वस्ती मध्ये एक मोर आढळून आल्याने तेथील लोकांनी नगरसेवकास सुचना दिली. नगरसेवकानी वन विभाग व वाइल्ड अनिमल अँण्ड नैचर रेस्क्यु बहु द्देशीय संस्था हयांना फोनव्दारे माहीती देताच वन विभाग आणि संस्था सदस्यांनी ताबडतोब दखल घेत घटनास्थळी लवकरात लवकर पोहचुन त्या मोराला ताब्यात घेऊन सुखरूप वन विभाग नागपुर येथील टी टी सी सेंटर च्या स्वाधिन करून मोराला जिवनदान दिले. ही कार्यवाही वाइल्ड अनिमल अँण्ड नैचर रेस्क्यु बहुद्देशी य संस्था कन्हान (नागपुर) चे सचिव राम जामकर, सदस्य उत्तम शरणागते, वन विभागाचे अधिकारी हरिश किनकर (वनरक्षक), आशीष महल्ले, शुभम मंगर,महेश मोरे आणि गिट्टीखदान पोलिस स्टेशनचे शिपाई आदीने यशस्विरित्या पार पाडत सुरेंद्रगढ नागपुर येथील नगरसेवक व नागरिकांनी वन्य जिवाला हाणि न पोहचविता वन विभाग व वाइल्ड अनिमल संस्थेला सुचना देऊन वन्य प्राणी मोराचे रक्षण केल्याने त्यांच्यातील वन्य प्राणी व निसर्गाच्या विषयी जागरूकता असल्याबद्दल नगरसेवक व लोकांचे कौतुक करून आभार व्यक्त करण्यात आले.