नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवार ता.2) 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे परवानगीशीवाय बेकायदेशीर रोडवर शेडचे बांधकाम केल्याबद्दल श्री सदानंद पाटील, सुरज सोसायटी, मनिष नगर येथे कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली. पथकाने गांधीबाग झोन अंतर्गत चंदु किराणा स्टोअर्स या दुकानावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मिडकेअर पॅथोलॉजी लॅब, प्रभाग क्र. 24, एच.बी. टाऊन, जुना पारडी नाका, नागपूर यांच्याविरूध्द अनधिकृतपणे जैव वैद्यकीय कचरा टाकल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला. त्याचप्रमाणे ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.