ड्रॅगन पॅलेस येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त ज्येष्ठ समाजसेविका डॉ रुपाताई कुळकर्णी बोधी यांचा सत्कार.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-बिडी कामगार,बुनकर कामगार,सफाई कामगार व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचा सुद्धा दादासाहेब कुंभारे स्मूर्तीचिन्ह देऊन करणार सन्मान.

कामठी ता प्र 30 :- एक मे 2023 रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन तसेच कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथील ऑडीटोरियम सभागृहात सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

दादासाहेब कुंभारे जन्म्शताब्दी वर्षानिमित्त सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या समाजसेवी,बिडी कामगार,विणकर इत्यादी असंघटित कामगारांचा सत्कार ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या ऑडिटोरियम सभागृहात सकाळी 9 वाजता संपन्न होणार आहे याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेविका व घरकाम करणाऱ्या महिलांसाठी न्याय हक्काच्या लढा देणाऱ्या डॉ रुपाताई कुलकर्णी यांचा सत्कार माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे यांच्या शुभ हस्ते होणार आहे.यावेळी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे सहाय्यक आयुक्त नंदलाल राठोड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.याप्रसंगी बिडी कामगार,बुनकर कामगार,सफाई कामगार इत्यादी मान्यवरांचा सुदधा दादासाहेब कुंभारे स्मूर्तीचिन्ह देऊन सत्कार करण्यात येईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

येरखेड्यात दिवसाढवळ्या तारा माता मंदिरातील दानपेटीतुन दान रक्कम चोरीला.

Sun Apr 30 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी – बारा हजार रुपये लंपास,  -अज्ञात चोराविरोधात नवीन कामठी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल कामठी ता प्र 30:-स्थानिक नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील तारा माता मंदिर न्यू येरखेडा येथे दिवसाढवळ्या सायंकाळी पाच वाजता सुमारास अज्ञात चोरांनी मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून मंदिराच्या आतील दानपेटी फोडली व त्यातील अंदाजे दहा ते बारा हजार रुपये अज्ञात चोराने लंपास केले असून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!