कॅम्पस ड्राईव्हमध्ये १३३ विद्यार्थ्यांची निवड

– विद्यापीठ रोजगार व प्रशिक्षण विभागाचे आयोजन

नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ रोजगार व प्रशिक्षण विभागाच्या वतीने सोमवार, १७ एप्रिल व मंगळवार, १८ एप्रिल २०२३ रोजी आयोजित कॅम्पस इंटरव्यूमध्ये एकुण तब्बल १३३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. हेक्सावेअर कंपनीत ४० तर तेली परफॉर्मन्स कंपनीत ९३ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. मिहान येथील हेक्सावेअर आणि टेलीपरफॉर्मन्स या दोन कंपनीकडून विद्यापीठ दीक्षांत सभागृह, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसर, रवींद्रनाथ टागोर मार्ग सिव्हिल लाईन नागपूर येथे विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने अधिकाधिक विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात रोजगार मेळावे आयोजित केले जात आहे. विद्यार्थ्यांचा देखील या रोजगार मेळाव्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.

मिहान येथील हेक्सावेअर या कंपनीकडून एक्झिक्यूटिव्ह व सीनियर एक्झिक्यूटिव्ह या पदाकरिता सोमवार, दिनांक १७ एप्रिल रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत मुलाखती घेण्यात आल्या. या कंपनीच्या मुलाखतीकरिता १४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. एकच दिवस आयोजित या मुलाखतीत तब्बल ४० विद्यार्थ्यांची हेक्सावेअर या कंपनीत निवड करण्यात आली. ४ विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहे. हेक्सावेअर कंपनीचे एचआर हेड देवेंद्र यादव, एचआर मॅनेजर स्वरूची डंबारे व अमिता जेठानी यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एक लाखांपासून ४ लाखांपर्यंत वार्षिक पॅकेज मिळणार आहे.

टेलीपरफॉर्मन्स या कंपनीकडून सोमवार, १७ व मंगळवार १८ एप्रिल या दोन दिवस सकाळी १०.३० वाजेपासून कॅम्पस मुलाखती घेण्यात आल्या. कस्टमर सर्विस असोसिएट्स ज्या पदाकरिता पहिल्या दिवशी १५० तर दुसऱ्या दिवशी ७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मुलाखतीनंतर पहिल्या दिवशी ६६ तर दुसऱ्या दिवशी २७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक १.८ ते ४ लाख रुपयांचे पॅकेज या पदाकरिता दिले जाणार आहे. टेलीपरफॉर्मन्स कंपनीची मुलाखतीकरिता सुसज्ज असलेली एक बस विद्यापीठ परिसरात दाखल झाली होती. कंपनीच्या एचआर मॅनेजर दिक्षिता पटेल व अभिषेक जोशी यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या.

कुलगुरू व प्र-कुलगुरूंची भेट

दीक्षांत सभागृह येथे सुरू असलेल्या कॅम्पस इंटरव्यूला माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे यांनी भेट दिली. रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ. भूषण महाजन उपस्थित होते. यावेळी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी व प्र -कुलगुरू डॉ संजय दुधे यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. या रोजगार मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी विद्यापीठ रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ. भूषण महाजन यांनी प्रयत्न केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विद्यापीठात वल्र्ड आय.पी.आर. डे उत्साहात संपन्न

Wed Apr 19 , 2023
– पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्कबाबत विद्याथ्र्यांना मार्गदर्शन अमरावती :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील इनोव्हेशन, इन्क्युबेशन अॅन्ड लिंकेजेसच्यावतीने विद्याथ्र्यांना इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईटची माहिती व्हावी या उद्देशाने कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच वल्र्ड आय.पी.आर. डे चे आयोजन करण्यात आले होते.या माध्यमातून विद्यार्थी संशोधन अथवा इनोव्हेशनची जपवणूक करू शकतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर, प्रमुख अतिथी म्हणून कुलसचिव डॉ. तुषार देशमुख […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!