मुंबई :- भाजपा प्रदेश कार्यालयात शुक्रवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा राष्ट्रीय चिटणीस विजया रहाटकर, प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रवक्ते अतुल शाह, प्रदेश मुख्यालय सहप्रभारी सुमंत घैसास, प्रदेश मुख्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.