भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मनपातर्फे अभिवादन

नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि. १४ एप्रिल रोजी सकाळी मनपा मुख्यालयातील इमारतीच्या दालनात भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून मनपाचे आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी अभिवादन केले. याप्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मुख्य अभियंता राजीव गायकवाड, उपायुक्त रवींद्र भेलावे, उपायुक्त प्रकाश वराडे, माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक महेश धामेचा, सहायक आयुक्त विजय हुमने, शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर, उपमुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी. चंदनखेडे उपस्थित होते.यानंतर आयुक्तांनी नागपुरातील संविधान चौकामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने व अतिरिक्त आयुक्त राम जोशी उपस्थित होते.

मनपा आयुक्तांनी नागपूरकरांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, बाबासाहेबांनी आपल्यासाठी तयार केलेले संविधान सर्वोत्तम असून आपण सगळ्यांना त्याचा लाभ मिळत आहे. समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आणि सर्वजण समानतेने कसे राहू शकतील यासाठी बाबासाहेबांनी कार्य केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

MNS hits out at Indira Gandhi Hospital doctors' absenteeism and misconduct

Fri Apr 14 , 2023
Nagpur :-Under the leadership of City president Chandu Lade & south west Nagpur Vice chief Rahul Pande of Maharashtra Navnirman Sena along with MNS shakha adhyaksh Sagar Mankar and Aman Pawankar stormed Indira Gandhi Hospital,Gandhinagar which comes under Nagpur Municipal Corporation and reported the absence of doctors from their respective duties. “We have received serious complaints about misconduct of doctors […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!