250 वातानुकूलीत विद्युत बसेस खरेदीसाठी निधी देणार – देवेंद्र फडणवीस

· वातानुकूलीत विद्युत बसेसचे लाकार्पण

नागपूर :- शहरातील प्रवाशांना चांगली बससेवा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टिने स्मार्ट सिटी तर्फे 200 वातानुकूलीत विद्युत बससेवा सुरु करण्यात आली आहे. शहराच्या मागणीनुसार 250 वातानुकूलीत विद्युत बसेस खरेदी करण्यासाठी निधी देण्यात येईल. महानगरपालिकेने प्रवाशांना चांगल्या सेवा उपलब्ध करुन द्याव्यात असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.            संविधान चौकात स्मार्टसिटी प्रकल्पाअंतर्गत वातानुकूलीत विद्युत बसेसचे लाकार्पण उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना उपमख्यमंत्री बोलत होते. यावेळी केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. व्यासपीठावर आमदार प्रविण दटके, कृष्णा खोपडे, बंटी कुकडे, संदिप जोशी, महापालिका आयुक्त राधाकृष्ण बी. स्मार्टसिटीचे मुख्यकार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने, अतिरिक्त आयुक्त्‍ राम जोशी उपस्थित होते.

शहरातील नागरिकांना वातानुकूलीत बससेवा उपलब्ध करुन देतानाच प्रदुषण कमी व्हावे यासाठी वातानुकूलीत विद्युत बसेस सुरु करण्यात येणार आहेत. शहरासाठी 800 बसेसची आवश्यकता असून त्यापैकी 200 बसेस रस्त्यावर आजपासून धावणार असून राज्य शासनातर्फे 250 बसेस करिता निधी उपलब्ध करुन देण्यात असल्याचे सांगतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शहर बस थांबा अत्याधुनिक करतांना बस स्टॉपवर येणाऱ्या बसची माहिती असणारे इलेक्ट्रॉनिक फलक लावण्यात यावे. यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

शहरातील प्रदुषण कमी करण्यासाठी वातानुकूलीत विद्युत बसेसची संख्या वाढविणे आवश्यक आहे. विद्युत बसमध्ये दिव्यांग व जेष्ठ नागरिकांना सुलभपणे बसता व्यावे अशी व्यवस्था निर्माण करतांनाच प्रवाशांना तिकीट घेण्यासाठी अडचण होणार नाही या दृष्टिने मेट्रो व बसचे एकच तिकीट असावे या दृष्ट्रिने विशेष कार्ड करण्याच्या सुचना केंद्रिंय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

जुने वाहने निर्लेखित करण्याच्या केंद्राच्या योजनेनुसार 15 वर्षावरील सर्व वाहने महानगरपालिकेने निर्लेखित करावे अशी सूचना करातांना नवीन वाहनासाठी निधी उपलब्ध होईल. राज्य शासनाने नागपूर लॉजिस्टिक हब, नागपूर शहर विकासाठी 1 हजार कोटी बसस्थानकाचे अत्याधुनिकरण तसेच ॲग्रो कन्वेनशन सेंटरसाठी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विशेष आभार व्यक्त केले.

महापालिका आयुक्त राधाकृष्ण बी. यांनी प्रास्ताविकात नागपूर शहरातील प्रवासी वाहतूक बस सेवेचा विशेष आराखडा तयार केला असून त्याअंतर्गत 800 वातानुकूलीत विद्युत बसेसची आवश्यकता आहे. त्यापैकी 200 बसेस रस्त्यावर धावणार असून यामुळे प्रदुषण कमी होण्यास मदत होणार आहे. शहर बस सेवेतील 400 पेक्षा जास्त बसेस निर्लेखित होणार आहेत. मोरभवन, हिंगणा आदी बसथांबे अत्याधुनिक करण्यात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केले तर आभार स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने यांनी मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मौजा वांजरा येथे 480 घरकूल, उपमुख्यमंत्री व केंद्रिय मंत्री यांच्या हस्ते भूमिपुजन

Mon Mar 20 , 2023
नागपूर :- प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नागपूर महानगरपालिके तर्फे वांजरा येथे अल्प उत्पन्न गटासाठी वांजरा येथे 480 घरकूल प्रकल्प राबविण्यात येत असून या प्रकल्पाचे भूमिपुजन केंद्रिय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. नागपूर महानगरपालिका व स्वप्न निकेतन यांच्या संयुक्तपणे हा प्रकल्प सुरु करण्यात येत असून या प्रकल्पाअंतर्गत 14 हजार 160 चौरस मिटर परिसरात आठ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!