अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या प्रश्नावर मंत्र्यांचे उत्तर असमाधानकारक ; विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केला सभात्याग…

सर्वच प्रश्नावर मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री बोलणार असतील तर तुमच्या उत्तराला काय अधिकार…

मुंबई  – विधीमंडळ सभागृहातील शंभर आमदार अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मानधन वाढवून देण्याबाबत प्रश्न विचारत आहेत इतका गंभीर प्रश्न असताना संबंधित बालविकासमंत्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सांगणार आहेत असे बोलत असतील तर या मंत्र्यांना इथे उत्तर देण्याचा काय अधिकार आहे असा थेट सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.

अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधन वाढीचा प्रश्न सभागृहात आमदार पोटतिडकीने विचारात असताना बालविकास मंत्री समाधानकारक उत्तर देत नसल्याने विरोधी आमदार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

राज्यातील अंगणवाडी सेविकांना १५ हजार रुपये मानधन आणि मदतनीसांना १० हजार रुपये मानधन देणार का? असा सवालही अजित पवार यांनी मंत्र्यांना केला.

दरम्यान अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या प्रश्नावर योग्य ते व समाधानकारक उत्तर बालविकास मंत्री लोढा यांनी न दिल्याने विरोधकांनी सभात्याग केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची धडक कारवाई

Sat Mar 4 , 2023
नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता.3) 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 1 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 5,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 1 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!