नागपूर :- हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांचा शिवजयंतीचा उत्सव सोहळा विश्वकर्मा नगर रोड क्रमांक सहा शिवआज्ञा मित्रमंडळातर्फे शिवाजी महाराजांची आरती करून 19 आणि 20 फेब्रुवारीला प्रचंड उत्सवात साजरा केला. मंडळाचे हे चौथे वर्ष असून दरवर्षी नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. या वर्षी लहान बालकांचा सहभाग लक्षणीय होता. या निमित्ताने हरिभक्त परायण प्रसाद महाराज जोशी ,देहु यांनी किर्तनाच्या च्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या जीवनाचा विस्तृत परिचय करून दिला आणि प्रबोधन केले . मुख्य वक्ते म्हणून मुक्त पत्रकार आणि पर्यटन लेखक श्रीकांत पवनीकर यांनी आग्र्याच्या लाल किल्ल्यात हिरोजी फरचंद यांनी प्रतीशिवाजी बनून शिवाजी महाराजांना किल्ल्यातून निसटून जाण्यास मदत केल्याचा रोचक अनुभवाचे विश्लेषण केले.
या निमित्ताने पोषाख,चित्रकला,रॅली,सायकल रेसिंग,भाषण, रंगोली,चमचा लिंबु, थाळी,वरिष्ठ नागरिकांची संगीत खुर्ची अशा विविध प्रकारच्या स्पर्धा घेऊन विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसांचे वाटप करण्यात आले.
महिला अध्यक्षा शर्वरी आगाशे, चंदु खाडे, सीमा यादव आणि त्यांच्या चमूने कार्यक्रमाचे सुरेख नियोजन करून भरपूर परिश्रम घेतले. ज्येष्ठ लेखिका आणि निवृत्त संस्कृत प्राध्यापिका डॉ.विमाल पवनीकर या विशेषत्वाने उपस्थित होत्या.
या वेळेस आ.मोहन मते, नितिन गडकरीचे सचिव आणि सी.ए. संघटनेचे अध्यक्ष माधव विचोरे, चन्द्रशेखर खाडे, शिरीष सुरकर ,प्रदीप रोडे, आशीष डोंगरे, यांनी मंडपाला भेट देऊन आणि दर्शन घेऊन आनंद व्यक्त केला. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.