मुंबई :- संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे अभिवादन केले.
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार नीलेश लंके, संजय रायमूलकर, प्रशांत बंब, राजेंद्र यड्रावकर, संजय गायकवाड यांनीही संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.