कंत्राटी कर्मचाऱ्यांना शिस्त लावणाऱ्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाही

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- नागपूर जिल्हा परिषदच्या कामठी पंचायत समितीचे तत्कालीन गटशिक्षण अधिकारी नागपुरे हे आठवड्यातून फक्त दोन दिवस कार्यालयात राहायचे व सर्व शिक्षा अभियानचा मोबाईल शिक्षक मिलिंद मानकर हा त्यांच्या व्यक्तिक गाडीवर त्यांच्या मागील 2 वर्षीच्या कार्यकाळात वाहनचालक म्हनुन काम करायचे ,सर्व शिक्षा अभियान कनिष्ठ अभियंता विवेक जैस्वाल महिन्यात फक्त 3 ते 4 दिवस कार्यालयात येत असायचे याप्रकारच्या चर्चेला पंचायत समितीच्या शिक्षण विभागात मोठा उत आला होता त्यामुळे कार्यालयीन एकोप्याच्या वातावरणात बिघाड आले होते.दरम्यान पंचायत समितीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न गटशिक्षणाधिकारी कश्यप सावरकर यांनी केला होता.यावर कश्यप सावरकर हे कंत्राटी कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देण्यासह पगार बिल विलंबाने करतात ,अनुदान आल्यावरही कर्मचाऱ्यांना बिलास विलंब करतात ,मानसिक छळ करतात, उशिरा संदेश देण्यासह अनेक तक्रारीचा ठपका लावत समग्र शिक्षा अभियान मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सीईओ सौम्या शर्मा यांच्याकडे तक्रार केली त्या तक्रारीच्या आधारे समस्त कंत्राटी कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदवित मिळालेल्या अहवाला वरून सीईओ सौम्या शर्मा यांनी शिक्षण विस्तार अधिकारी कश्यप सावरकर यांना नुकतेच निलंबीत केले आहे.

तर या निलंबन प्रकरणात चौकशी अधिकारी यांनी दबावाखाली चौकशी अहवाल तयार केला,फक्त तक्रारकर्तायांचे म्हणने लिहिले आणि कोणतीही शहानिशा न करता तेच खरे आहे असे अहवालात नमूद केले.यावर निलंबित झालेले कश्यप सावरकर यांच्या अभिवेदनाचा कोणताही विचार केला नाही, तसेच पदाधिकारीच्या दबावाखाली अहवाल तयार करून सादर केला आहे तर दोषी नसतांनाही कारवाई केली आहे,म्हणणे मांडण्याची संधी दिली नाही त्वरित निलंबित करण्यात आले आहे असे मत निलंबित शिक्षण विस्तार अधिकारी कश्यप सावरकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधी कडे केले आहे तर या चुकीच्या कारवाहिला बळी पडलेले कश्यप सावरकर संदर्भात तालुक्यातील शिक्षकांमध्ये निलंबन करणाऱ्या अधिकारी विरोधात असंतोष निर्माण झाला आहे.

शिक्षण विस्तार अधिकारी कश्यप सावरकर -एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया चा 12.50 लक्ष रुपयांचा सीएसआर तत्कालीन गटशिक्षणाधिकारी प्रदीप नागपुरे आणि सर्व शिक्षा अभियान च्या कर्मचारी यांनी संगनमताने केलेला आहे, तो लपवून ठेवण्यासाठी या कर्मचाऱ्यांना तक्रार करायला लावली आहे।

सदर तक्रारी मध्ये 2 वर्षांपूर्वी न घडलेल्या बाबी रंगवून तक्रार केली आहे तसेच यापूर्वी या सर्वांनी मिळून जो सर्व शिक्षा अभियान चा कर्मचारी त्यांच्या चुकीचे कामात साथ देत नव्हता त्याची खोटी माहिती देऊन दुसरीकडे बदली केली आहे, पंचायत समिती कामठीच्या मासिक सभेत सदर अधिकारी यांनी या तालुक्यात नेहमीच चांगले काम केले आहे, त्यांच्यावर झालेली कारवाई चुकीचे असल्याने सर्वानुमते निलंबन रद्द करण्याचा ठराव घेतला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ARMY TO OPEN SITABULDI FORT ON 12 FEBRUARY 2023

Fri Feb 10 , 2023
Nagpur :-Heritage Sitabuldi Fort will be opened to general public on 12 February 2023. Public can visit the Historical Fort from 12 PM to 4 PM. The entry to the Fort shall be from Army Recruiting Office gate opposite the Railway Station. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!