-मिशन लेफट आऊटसाठी उरलेत फक्त दोन दिवस
भंडारा :- ओमिक्रॉनच्या रूग्ण संख्येत राज्यभरात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. विषाणूमुळे तिसरी लाट येण्याची चिन्हे दिसत आहे.जिल्हा प्रशासनातर्फे 24 ते 31 डिसेंबर दरम्यान विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. त्याला फक्त शेवटचे दोन दिवस उरले असून ज्यांचे अदयाप पहीला व दूसरा डोस प्रलंबित आहेत. त्या आधी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आग्रही प्रतिपादन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे.
लसीकरणासाठी आलेसूरसारख्या दुर्गम भागापासून तर लाखनी तालुक्यातील शिवनी गावापर्यत गावांनी उत्तम कामगिरी केली आहे. सध्या या मोहीमेत महीला वर्ग, मजूर, असंघटीत क्षेत्रातील कामगार, गृहीणी, जेष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. तरी देखील शेवटच्या दोन दिवसात म्हणजे 30 व 31 डिसेंबरपर्यंत ही मोहीम राबविण्यात येत आहे. या दोन दिवसात लसीकरण न केलेल्या नागरिकांनी लसीकरण करून घेतल्यास तिसऱ्या संभाव्य लाटेच्या प्रसाराला नक्कीच ब्रेक मिळू शकतो.
प्रसाराचा वेग अधिक
मुंबईमध्ये रूग्ण संख्या वेगाने वाढत असून शेजारच्या नागपूर जिल्हयात कमी कालावधीत 44 रूग्णसंख्या झाली आहे. ही धोक्याची घंटा आहे. ओमिक्रॉनच्या प्रसाराचा वेग हा अधिक असून अश्यावेळी मास्क्,सॅनिटायझर,व शारीरिक अंतर यांचे पालन करणे आवश्यक आहे.