संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियांन अंतर्गत 10 कोटी रुपयांच्या मंजूर निधीतून माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभ हस्ते प्रभाग क्र 14 येथे 2018 मध्ये पर्जन्य जलवाहिनी बांधकामाच्या 63 लक्ष 18 हजार 150 रुपयांच्या निधीतून रमानगर ते कामगार नगर पर्यंत नाला बांधकामाचे मोठ्या थाटात भूमिपूजन करण्यात आले होते हे भूमिपूजन होऊन आज 4 वर्षाचा कार्यकाळ लोटला मात्र बांधकामाचा मुहूर्त अजूनही मिळालेला नव्हता त्यातच या नाला बांधकामाला कसाबसा सुरुवात करताच हे बांधकाम कलव्हर्ट अभावी होत असल्याने या नाला बांधकामात कुठलाही राम राहणार नसून उलट या नाल्याचे सांडपाणी परिसरातील नागरिकांच्या घरात शिरेल तेव्हा या नाला बांधकामाचा शुभारंभ या नाल्याचा कलव्हर्ट बांधकाम करून करावा अशी मागणी रेटून धरत बांधकाम कर्मचाऱ्यांना धारेवर घेत संतप्त महिलांनी नगर परिषद प्रशासनाला वेठीस धरले.
मंजूर 10 कोटी रुपयांच्या मंजूर विकासकामात 2 कोटी 6 लक्ष 24 हजार 936 रुपयांच्या निधीतून बैल बाजार ते कोळसाटाल ते लाला ओली नाला बांधकाम, 64 लक्ष 45 हजार 870 रुपयांच्या निधीतून दरोगा मशीद ते वारीसपुरा मस्जिद ते बागडोर नाला बांधकाम, 1 करोड 77 लक्ष 8 हजार 346 रुपयांच्या निधीतून गौतम नगर ते पोरवाल कॉलेज ते स्लाटर हाऊस नाला बांधकाम , 93 लक्ष 52 हजार 89 रुपयाच्या निधीतून मच्चीपुल ते मांगपुरा नाला बांधकाम, 63 लक्ष 18 हजार 150 रुपयाच्या निधीतून रमानगर ते कामगार नाला बांधकाम , 26 लक्ष 25 हजार 156 रुपयांच्या निधीतून बुनकर कॉलोनी ते पासीपुरा नाला बांधकाम, 3 करोड 38 लक्ष 47 हजार 647 रुपयांच्या मंजूर निधीतून ड्रॅगन पॅलेस टेम्पल ते आजनी नाला बांधकाम , 15 लक्ष 42 हजार 471 रुपयाच्या निधोतून नया गोदाम नाला बांधकाम चा समावेश असून यातील बोटावर मोजणारे एक दोन कामे झाले असतील मात्र यातील इतर मंजूर कामाचा अजूनही बांधकामास सुरुवात झाली नसल्याने नागरिकांत प्रशासनाच्या विरोधात रोष निर्माण होत आहे.
तर याच तुलनात्मक दृष्टिकोनातून रमानगर ते कामगार नगर पर्यंत बांधकाम करण्यात येणाऱ्या नाला बांधकाम हे कलव्हर्ट बांधकामातुन होईल का?असा प्रश्न येथील संतप्त रमानगरवासी करीत आहेत.