नागपूर :-हिंगणा क्षेत्रातील क्षत्रिय मराठा कलार समाज महिला मंडल अमर नगर, वानाडोंगरी व समस्त महीला भगीनी यांच्या संयुक्त विद्यमाने संजय जगताप यांनी दिलेल्या सुनियोजीत भुखंडावर २६ जानेवारी रोजी “नारी शक्ती सौभाग्याचे लेणे हलदी-कुंकु कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाप्रसंगी दिप प्रज्वलित करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली असून यावेळी अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक लक्ष्मीबाई मेहतरलाल दियेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षणाची प्रणेत्या व विद्येची जननी सावित्रीबाई फुले यांचे फोटोला माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून पूर्व महीला मंडल अध्यक्षा सुहासिनी दियेवार, पुर्व उपाध्यक्षा अल्का जमेवार, पूर्व कोषाध्यक्षा अंजू भोयर व पूर्व महीला सचिव पूजा भोयर प्रामुख्याने उपस्थित होत्या.
महिलांना वाण देऊन विविध मनोरंजन कार्यक्रम घेण्यात आले. संयम व सहकार्य सोबत राहिले तर होणारे कार्य जलद गतीने होते असे आवाहन अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महीला मंडल अध्यक्षा रुखमा सोनवाने, संगीता चौरागडे, अनुराधा महाजन (डोहळे) सुनिता बिजेवार, रेखा चौरागडे, ललीता कावळे, हेमलता बिजेवार, इंद्रकला डोहळे, वर्षा डहाके, सुनिता पु. बारेवार, जयताबाई हिरेखन, अर्चना कावळे, लक्ष्मी दियेवार, भुमेश्वरी भु.जमईवार (डिफेन्स) यांनी अथ्थक परिश्रम घेतलेत. कार्यक्रमाचे संचालन व आभार संगीता चौरागडे यांनी केले.
कार्यक्रमाला बहुसंख्येने अमरनगर हिंगणा क्षेत्रातील महिला भगीनी उपस्थित होत्या.