-सिल्लेवाडा परिसरातील घटना
-पोलीस गस्त वाढविण्याची मागणी
सिल्लेवाडा– सिल्लेवाडा वेकोली परिसरात अज्ञात समाजसंकटांचा वावर मोठया प्रमाणात वाढला आहे अलीकडे त्यांनी शाळा महाविद्यालयाना टार्गेट करने सुरू केले असून सिल्लेवाडा वेकोली परिसरात असलेल्या एका तोडफोड केली असल्याचे निदर्शनास आले आहे यासंदर्भात खापरखेडा पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस गस्त वाढविण्याची मागणी करण्यात आली असून समाजसंकटावर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.सिल्लेवाडा परिसर हा संवेदनशील असून या परिसरात मोठया प्रमाणात सराईत गुन्हेगार आहेत चरस, गांजा, गर्द सारख्या मादक पदार्थाना या परिसरातील तरुण आहारी गेला आहे शिवाय अवैध दारू विक्री जोमात आहे.
सिल्लेवाडा वेकोली परिसरात महाराष्ट्र विद्यालय कार्यरत आहे मात्र याठिकाणी दररोज रात्रीच्या सुमारास अज्ञात समाजसंकटांनी थांड मांडले आहे विद्यालय परिसरात बसून अमली पदार्थांचे सेवन करीत आहेत शिवाय मोठया प्रमाणात तोडफोड करीत आहे दिनांक २६ डिसेंबरला रात्रीच्या सुमारास वर्गखोलीचे दार तोडून डेक्स बेंचसह अन्य साहित्याची थोडफोड केली मुख्याध्यापक अहमद शेख २७ डिसेंबर सोमवारला विद्यालयात गेले असता सदर प्रकार उघडकीस आला यापूर्वीही विद्यालयात तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत.
वेळोवेळी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या मात्र कार्यवाही शून्य आहे मुख्याध्यापक अहमद शेख यांनी खापरखेडा पोलीस ठाणे गाठून रीतसर तक्रार दाखल केली असून पोलीस गस्त वाढविण्याची व अज्ञात समाज संकटावर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
-आकाश राऊत,
खापरखेड़ा-प्रतिनिधी