पारशिवनी :- पारशिवनी पोलिस स्टेशन अर्तगत दक्षिणेस १० कि मि अंतरावर असलेले जे के ब्रिक्स ईटभट्टा डोरली येथे मजुर अंकीत कमलेश जांगडे वय 21 वर्ष रा. दुरुगडी ता. बिलहा जिल्हा बिलासपुर (छत्तीसगड) ह.मु. डोरली तह. पारशिवनी यांनी आज रविवार दिनांक 22/01/23 चे दुपारी ०२.०० वाजता च्या सुमारास पैशाचे तंगीच्या कारणांवरून गळफास घेवुन आत्महत्या केल्याने पोलिस स्टेशन पाराशिवनी येथे मर्ग क्र. – 1./23 कलम 174 जा.फौ. चा गुन्हा फिर्यादी अजय प्रियदास दिवाकर वय 25 वर्ष रा. गंगव्दररी ता. पथरिया जि. मुंगेली (छत्तीसगढ) ह.मु. डोरली तह. पारशिवनी यांची तक्रारी वरून दाखल करून पोलीस हवालदार सुरेश धुर्वे तपास करित आहे
पोलिस सुत्रान्दारे माहीती मिळाली की की, यातील घटना दिनांक २२ जनवरी रविवारी दुपारी मृतक अंकीत कमलेश जांगडे वय 21 वर्ष रा. दुरुगडी ता. बिलहा जिल्हा बिलासपुर (छत्तीसगड) ह.मु. ज के ब्रिक्स कपनी डोरली तह. पारशिवनी जिल्हा नागपुर याने पैशाचे तंगीचा कारणावरुन डब्लु सी. एल. चे नर्सरीत झाडाचे फांदीला दुपट्याने बांधून गळफास घेऊन मरण पावल्याचे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून सदरचा मर्ग दाखल करून पुढील तपास पो.हवा. सुरेश धुर्वे हे तपास करित आहे .