समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनात एकमुखी मागणी !

पाकिस्तानी हिंदूंवरील अत्याचार दूर करण्याची भूमिका मांडून पाकिस्तानवर जागतिक निर्बंध लादण्याची मागणी भारत सरकारने करावी!

नागपूर :- झारखंड राज्यातील समेद शिखरजी या जैन समाजाच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असलेल्या धर्मस्थळाचा व्यवसायिक दृष्टीने पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. यासंदर्भात केंद्र शासनाने वर्ष 2019 मध्ये काढलेल्या अधिसूचनेतील काही तरतुदी मागे घेतल्याने झारखंड सरकारचा हा धार्मिक स्थळाला पर्यटन बनवण्याचा डाव संपुष्टात आला आहे, याबद्दल केंद्र शासनाचे आम्ही अभिनंदन करतो. यासह सम्मेद शिखरजी या धार्मिक स्थळाला ‘तीर्थक्षेत्र’ म्हणून घोषित करावे, ही जैन समाजाची मागणी त्वरित मान्य करावी, अशी मागणी नागपूर येथील संविधान चौकात झालेल्या हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनाद्वारे केंद्र शासनाकडे करण्यात आली. या आंदोलनात राष्ट्रीय युवा गठबंधन, हिंदू विधीज्ञ परिषद, सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती आदी संघटना सहभागी झाल्या होत्या. जैन समाजाच्या 24 तीर्थकरांपैकी 20 तीर्थकर सम्मेद शिखरजी या पवित्र पर्वतावर साधना करूनच मोक्षाला गेले आहेत, त्यामुळे जैन समाजाची या धार्मिक स्थळाप्रती श्रद्धा आहे. हिंदू धर्मात गंगेत स्नान केल्याने पापे धुतले जातात, अशी धारणा आहे त्याचप्रमाणे जैन समाजात सम्मेद शिखरजी पर्वतावरील 27 की.मि. पदयात्रा केली की नरकात स्थान मिळत नाही आणि स्वर्ग प्राप्ती होते, अशी जैन समाजाची धारणा आहे.अयोध्या, मथुरा, काशी यांचे हिंदू समाजासाठी जे महत्त्व आहे, मुसलमानांसाठी मक्का मदिनाचे जे महत्त्व आहे, ख्रिस्त्यांसाठी व्हॅटिकनचे जे महत्त्व आहे, शिखांसाठी सुवर्ण मंदिराचे जे महत्त्व आहे तेवढेच जैन समाजासाठी ‘सम्मेद शिखरजी’ या धर्मस्थळाचे महत्त्व आहे. त्यामुळे या क्षेत्राला तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करावे, अशी आमची मागणी आहे.

पाकिस्तानातील हिंदूंच्या निशृन्स हत्यां विषयी भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवावा अशीही मागणी करण्यात आली.

पाकमधील सिंझोरो शहरात 2022 या सरत्या वर्षाच्या शेवटी  दयाभिल या विधवा हिंदू महिलेची हत्या करण्यापूर्वी तिचे स्तन कापण्यात आले होते, नंतर तिचे शरीर धडापासून वेगळे कापण्यात आले, तिचा मृतदेह छिन्न विछीन्न स्थितीत रस्त्यावर टाकून देण्यात आला होता, तिच्या चेहऱ्यावरील मासही काढण्यात आले होते. इतकी क्रूर आणि निर्दयीपणे हत्या केली आहे, इतके होऊनही पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या घटनेविषयी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यातून पाकिस्तानची तेथील अल्पसंख्यांक हिंदूं बद्दलची असंवेदनशीलता दिसून येते. भारतातील मुसलमानांबद्दल जरा जरी खुट्ट झाले, तरी जगभरातील मुसलमान भारतावर आगपाखड करताना दिसतात. मात्र एका असहाय्य हिंदू विधवा महिलेची इतकी क्रूर आणि निर्दयीपणे हत्या होऊनही इस्लामी राष्ट्रीय तर सोडाच अन्य कोणतीही राष्ट्रीय किंवा संयुक्त राष्ट्र संघ अशा घटनांची दखल घेताना दिसत नाही. भारत सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संयुक्त राष्ट्र संघामध्ये पाकिस्तानी हिंदूंवरील अत्याचार दूर करण्याची भूमिका मांडून पाकिस्तानवर जागतिक निर्बंध लादण्याची मागणी करावी,अशी मागणी या आंदोलनात करण्यात आली. सदर विषय रणरागिणी च्या सौ. नमिता काकडे यांनी मांडला तर ‘सम्मेद शिखरजी’ हे तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करावे हा विषय हिंदू जनजागृती समितीचे अतुल अर्वेनला यांनी मांडला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

WCL wins the CIL Inter Company Cricket Tournament 2022-23

Sun Jan 22 , 2023
Nagpur :-WCL has won the CIL Inter Company Cricket Tournament 2022-23 organised at the WCL HQ from 16th to 21st January 2023. WCL beat the Northern Coalfields Limited (NCL) team in the finals to win the title. The tournament included teams from WCL, BCCL, CIL, CCL, CMPDIL, ECL, MCL, NCL, SCCL and SECL. In the final match, NCL, batting first, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com