१४ ठिकाणी ७ दिवसीय शिबीरांचे आयोजन
चंद्रपूर :- राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्र व पतंजली योग समिती – योगनृत्य परीवाराच्या संयुक्त विद्यमाने रोगमुक्त चंद्रपूर अभियानाची सुरवात २२ जानेवारी पासुन शहरात १४ ठिकाणी ७ दिवसीय निःशुल्क योग प्राणायाम व आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्यापासुन होत आहे. या शिबिरांत सहभागी होऊन आपले आरोग्य जपण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.
निरोगी व स्वास्थ्य आरोग्य ठेवण्यासाठी सकारात्मक विचार, व्यसनमुक्ती,रोग प्रतिकारात्मक शक्ती वाढविण्यासाठी ही योग प्राणायाम व आरोग्य शिबिरे आयोजीत करण्यात आली असुन मनपा आरोग्य विभाग येथे किंवा ९१७५९२५७८२ या क्रमांकावर संपर्क करून नागरीकांना नोंदणी करता येणार आहे.
सध्या पतंजली योग समितीद्वारे ८५ तर योगनृत्य परीवाराद्वारे ५७ केंद्रांवर योगवर्ग शहरात घेतले जातात. मात्र जे नागरीक योग वर्ग व त्याद्वारे होणाऱ्या लाभापासुन वंचित आहे त्या सर्वांसाठी मनपाद्वारे योग शिबिरे घेतली जाणार आहेत. लवकरच योग समिती व मनपा यांची संयुक्त योग समिती तयार केली जाणार असुन त्याद्वारे योगचा प्रचार प्रसार होण्यास मदत मिळणार आहे. या योग शिबिरांचा अधिकाधिक नागरीकांनी लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
येथे होणार शिबिरे –
रामकृष्ण मंदिर कृष्ण नगर,श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान स्नेहनगर,नुतन व्यायामशाळा घुटकाला वॉर्ड, पाचदेऊळ मंदिर गंज वॉर्ड,मनपा शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्र.५ बाबुपेठ,काळाराम मंदिर समाधी वार्ड,हनुमान मंदिर वैद्य नगर तुकूम येथे तर योगनृत्य परीवारातर्फे दीनदयाळ उपाध्याय गार्डन दुर्गा माता मंदिर जवळ सरकार नगर, हनुमान मंदिर स्वावलंबी नगर नगिनाबाग,नेहरू विद्यालय घुटकाळा वार्ड,महाकाली कॉलरी कँटीन चौक,हिंगलाज भवानी शाळा बाबुपेठ,कोहिनुर स्टेडीयम, शिवसाई मंदीर गोपाळ नगर दे.गो. तुकूम
वेळ – सकाळी सकाळी ६ ते ८
आरोग्य तपासणी – नागरीकांची आरोग्य तपासणीही मनपा आरोग्य विभागातर्फे केली जाणार आहे.