जिल्हाधिकाऱ्यांनी वाहिले पुष्पचक्र ; पोलीसांची सलामी
नागपूर : लष्कराच्या कीर्तीचक्र या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे विदर्भातील एकमेव मानकरी प्रभाकर पुराणिक (86 वर्षे) यांच्या पार्थिवावर आज अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार पार पडले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली.
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ.शिल्पा खरपकर, सहायक जिल्हा कल्याण सैनिक अधिकारी सुबेदार मेजर सतेंद्रकुमार चवरे,मेजर जनरल (निवृत्त) देव,माजी महापौर संदिप जोशी यांच्यासह माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, महानगर पालिकेचे अधिकारी-कर्मचारी, माजी सैनिक आदी उपस्थितांनीही आदरांजली वाहिली.
पोलीस तुकडीने मानवंदना दिली व विविध शासकीय व सैनिक संघटनांच्यावतीने यावेळी पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहण्यात आली.
प्रभाकर पुराणिक यांचे सोमवारी (16 जानेवारी) सायंकाळी निधन झाले. देशाच्या सीमा भागात रस्ते निर्मिती करणाऱ्या बॉर्डर रोड ऑर्गनायजेशनमध्ये अभियंता म्हणून कार्य करणाऱ्या पुराणिक यांना 1972 मध्ये शातंताकाळातील शौर्य पुरस्कार किर्तिचक्राने सन्मानित करण्यात आले होते.