नागपूर :-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात खासदार क्रीडा महोत्सवाचे पाचवे पर्व सुरू आहे. या पर्वात महिलांसाठी विशेष ‘ओ वुमनिया’चे आयोजन करण्यात आले. महिलांना त्यांच्यातील क्रीडा गुणांना मुक्त व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने मनोरंजनाची जोड देउन या क्रीडाशैलीतील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी 15 जानेवारी रोजी यशवंत स्टेडियमवर ओ वुमनियाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रणेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वत: यशवंत स्टेडियमवर भेट देउन ‘ओ वुमनिया’त सहभागी सर्व महिलांना प्रोत्साहन दिले. यावेळी सुप्रसिद्ध गायिका अनुराध पौडवाल यांची विशेष उपस्थिती होती. खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी, खादी व वस्त्रोद्योग आयोगाचे सदस्य जयप्रकाश गुप्ता, सुधीर दिवे, अश्विनी जिचकार, माजी नगरसेविका वर्षा ठाकरे, मनीषा कोठे, मनिषा काशीकर आदींची उपस्थिती होती.