राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसमध्ये मला सन्मानजनक वागणूक -पद्मश्री राहीबाई पोपेरे

नागपूर : राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसमध्ये मला सन्मानजनक वागणूक मिळाली असून मला माझे म्हणणे या व्यासपीठावरून मांडता आले.तरी माझा अवमान झाला वा मला बोलू दिले नाही हे वृत्त निराधार असल्याचे बीजमाता म्हणून ख्यातनाम असलेल्या राहीबाई पोपेरे यांनी स्पष्ट केले आहे ,असे महिला विज्ञान काँग्रेसच्या संयोजक डॉ.कल्पना पांडे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसमध्ये पद्मश्री पोपेरे यांना आंमत्रित करून त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा येथे भेट देणाऱ्या वैज्ञानिक व विज्ञानाच्या अभ्यासकांना व्हावा हाच शुध्द हेतु होता. त्यानुसार दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी त्यांनी महिला विज्ञान काँग्रेससह एकूण तीन आयोजनात सहभाग घेवून उपस्थितांना मार्गदर्शन केले. या दरम्यान पोपेरे यांना भाषण देण्यापासून थांबवण्यात आले नव्हते असे सांगत डॉ  पांडे यांनी पोपेरे यांनी पाठविलेले निवेदन पत्रकारांना दाखविले. यावेळी कुलगुरु डॉ सुभाष चौधरी आणि शेतकरी विज्ञान काँग्रेसचे संयोजक डॉ. प्रकाश इटनकर उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

L & T Skills Trainers Academy completestraining 1000 ITI instructors, Maharashtra Governor, L & T Chairman attend Festival of Skills

Sun Jan 8 , 2023
Mumbai :-Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presided over the concluding session of ‘Kaushal Utsav’, a festival of skills organised by L & T Skill Trainers Academy at Madh Island off Mumbai on Sat (7 Jan). The Kaushal Utsav was organised by L & T to mark the completion of 5 days of specizlied training of 1000 trainers of Industrial Training […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com