संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- 18 डिसेंबरला पार पडलेल्या कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतच्या थेट जनतेतून 27 सरपंच तसेच 93 प्रभागातून 247 सदस्यांची निवड करण्यात आली.यातील उपसरपंच पदाची निवडणूक ही तीन टप्प्यात होऊ घातली आहे त्यानुसार आज 6 जानेवारीला 9 ग्रामपंचायतची उपसरपंच पदाची निवडणूक पीठासीन अधिकारी नवनिर्वाचित सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली व निवडणूक अधिकारी यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडली.
उपसरपंच पदाची निवडणूक पार पडलेल्या या 9 ग्रामपंचायत पैकी खैरी ग्रामपंचायत ची उपसरपंच पदाची अविरोध पार पडली ज्यामुळे उपसरपंच पदी रामदयाल ठाकरे ची निवड करण्यात आली.येरखेडा ग्रा प च्या उपसरपंच पदी मंदा प्रमोद महल्ले, रणाळा ग्रा प उपसरपंच पदी अंकिता तळेकर, बिना ग्रा प उपसरपंच पदी हरीश गजभिये, भिलगाव ग्रा प उपसरपंच पदी मनोज जिभकाटे,खसाळा ग्रा प उपसरपंच पदी अतुल बावनकुळे,सुरादेवी ग्रा प उपसरपंच पदी संदीप कोडापे ,खापा ग्रा प उपसरपंच पदी निजाम बराडे तर गुमथी ग्रा प उपसरपंच पदी रंजना मानवटकर निवडून आले.