नागपूर, दि. ३० : “विश्वगौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींच्या निधनाची वार्ता दुःखद आहे. केवळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचीच नव्हे तर संपूर्ण देशाचीच ही हानी आहे. त्याग, समर्पण, निष्काम कर्मयोगी जीवनाचा शतकाचा प्रवास हिराबांच्या निधनाने आज संपला. मातृवियोगाचे दुःख मोठे असते. हे दु:ख सहन करण्याची शक्ती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मिळो. संपूर्ण देश मोदी परिवाराच्या दुःखात सहभागी आहे. स्वर्गीय हिराबांना ईश्वर सद्गती देवो. या महान मातेला माझी भावपूर्ण श्रद्धांजली.”, अशा शब्दात वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपला शोक व्यक्त केला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जडणघडणीत त्यांच्या मातोश्री हिराबांचा वाटा मोठा आहे. ‘काम करो बुद्धी से, जीवन जीयो शुद्धीसे’ ही त्यांनी दिलेली शिकवण प्रधानमंत्री मोदी यांनी मोलाने जपली”, अशा शब्दात मुनगंटीवार यांनी स्वर्गीय हिराबांच्या प्रति आदरभाव व्यक्त केला.