दहा पदकांचा मान मिळवणारा नागपूरचा ओजस देवतळे एशिया चषक स्पर्धेत चमकला.
नागपूर :-नागपुरातचा नवोदित तिरंदाज ओजस प्रवीण देवतळे याने शारजाह, दुबई एशिया चषक स्टेज थ्री मध्ये तिरंदाजी स्पर्धेत प्रशंसनीय कामगिरी करत सांघिक स्पर्धेत सुवर्णपदका सह वैयक्तिक स्पर्धेत रौप्य पदक पटकावले. आंतरराष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. उपराजधानीत नागपूर या स्पर्धेत भारतीय तिरंदाजाचे हे पहिलेच पदक असून 5 सुवर्ण पदके, 3 रौप्य पदके आणि 2 कांस्य पदक अशी एकूण 10 पदकांचा मान मिळविला आहे.
भारताच्या इतिहासात प्रथमच दहा पदकांचा मान सन्मान प्राप्त झाले आहे. एशिया चषक स्पर्धेचे प्रशिक्षक प्रवीण सावंत सातारा यांना दिले आणि जीशान मोहम्मद नागपुरे व त्याची आई अर्चना व वडील प्रवीण देवतळे यांना या यशाचे श्रेय दिले आहे. नागपूर वासीयांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .