नागपूर – नुकताच पारपडलेल्या ग्लोबल नागपूर समिट २०२१ दरम्यान
श्री स्वप्निल अरुण गावंडे व दिशा ग्रुप, दिशा मेडिकल अँड एज्युकेशन फाऊंडेशन यांना ग्लोबल नागपूर अवॉर्ड २०२१ ने सन्मानात करण्यात आले. केंद्रीय मंत्री मा.श्री नितीन जयराम गडकरी यांनी हा पुरस्कार देऊन श्री स्वप्निल अरुण गावंडे यांचा सन्मान केला. या वेळी संसद श्री अजय संचेती, वैज्ञानिक डॉ रघुनाथ माशेलकर, नागपूरचे महापौर श्री श्रमसुंदर तिवारी, विभागीय आतुक्त श्रीमती प्राजक्ता वर्मा, पर्सिस्टन्ट सिस्टिमच्या संचालिका श्रीमती देशपांडे, दालमिया चे कार्यकारी अध्यक्ष श्री हाकिमुद्दीन अली इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार नागपूर येते देण्यात आला.
स्वप्नील गावंडे या युवकाने सहावीत असताना नेत्रदानाच्या कार्याची सुरुवात केली. त्याच्या सोबत संगीत शिकणारा एक मित्र नेत्रहीन होता. मित्राला नेत्र प्रत्यारोपण करून दृष्टी प्राप्त होऊ शकते असे स्वप्नीलला कुणीतरी सांगितले. नेत्र.दान- नेत्र प्रत्यारोपण हे सर्व शब्द सहावीतल्या स्वप्निलसाठी अगदी नवीन होते. पण आपल्या मित्राला दिसावे हि तीव्र इच्छा त्याला स्वस्थ बसू देईना. त्याने नेत्रदानाबद्दल घरी व बाहेरही माहिती मिळविणे सुरु केले. स्वतःच्याच शाळेत सातवीला असताना नेत्रदानाबद्दल जागृतीपर भाषण दिले. त्याच वर्गात असताना अमरावती येथे एका व्यक्तीच्या अपघाती निधनानंतर होणारे नेत्रदान केवळ अमरावतीला नेत्रपेढी नसल्यामुळे होऊ शकले नाही हि बाब त्याला चांगलीच खटकली. आठवीला असताना तो अमरावती शहरातील १०-१२ नेत्ररोगज्ज्ञांना भेटला व नेत्रपेढी सुरु करणेबद्दल बोलला. पण फारसा उत्साहवर्धक प्रतिसाद नसल्याने त्याने स्वतःच नेत्रपेढी सुरु करण्याचा संकल्प घेतला.
आज दिशा ग्रुप द्वारे संचालित दिशा इंटरनॅशल आय बँक महाराष्ट्र मधील विविध जिल्ह्यामधे नेत्रदानाची २४ तास सेवा देत आहे. अमरावती जिल्ह्यामधे देखील दिशा इंटरनॅशल आय बँक हि एक मेवा शाशनमान्य धर्मादाय नेत्रपेढी आहे. नेत्रदानावर काम थांबवले नाही तर दिशा ग्रुपच्या अंतर्गत ग्रामीण व दुर्गम भागात नेत्र शल्यचिकित्सा पोचवण्यासाठी फिरते नेत्रालय सुरु केले आहे. या द्वारे जवळपास २१ हजार लोकांपरेंत नेत्रचिकित्सा पोहचू शकली.
मा. श्री नितीन गडकरी यांनी स्वप्निल अरुण गावंडे व दिशा ग्रुपला कार्यसाठी शुभेच्छा दिल्या. भारतासमोर अंधत्वाची एक मोठी समस्या उभी आहे. नेत्रदानामूळे दोन कोर्नेअल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. मृत्यू नंतर नेत्रदानासाठी काही काळजी घेणे गरजेचे आहे जसे मृत्यू नंतर सहा तासांपर्यंत नेत्रदान केला जाऊ शकते. त्यामुळे मृत्यू नंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्या खाली २ उश्या ठेवावा. पंखा बंद ठेवावा. ए.सी असेल तर सुरु ठेऊ शकता. मारनोतर नेत्रदानासाठी संपर्क दिशा इंटरनॅशनल आय बँक, चैतन्य कॉलनी,ओल्ड बायपास रोड, अमरावती मो. 9899898667, 8275539754, 7378656145. ऑनलाईन नेत्रदानाचा संकल्प करण्यासाठी भेट द्या