संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नेताजी चौकातिल एका खाजगी ट्युशन क्लासेसच्या शिक्षकाने शिकवणी वर्गातील 15 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला वर्गात हुशार असल्याच्या देखावा दाखवून शाबासकी देत मिठी मारल्याप्रकरणी खाजगी शिकवणी वर्गाच्या शिक्षकावर विनयभंगासह पोक्सो कायद्यांनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सदर पीडित अल्पवयीन 15 वर्षीय विद्यार्थिनी नेहमीप्रमाने नेताजी चौकात सुरू असलेल्या शिकवणी वर्गात ट्युशन साठी गेली असता वर्गात कुणी नसल्याचे संधी साधून तू वर्गात खूप हुशार असल्याची प्रशंसा करून पाठीवर शाबासकीची पाठ थोपटून मिठी मारल्याप्रकरणी पिडीत विद्यार्थिनीने जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून आरोपी खाजगी शिक्षकां विरुद्ध गुन्हा दाखल आरोपीस अटक करण्यात आले.