पारशिवनी :- पो.स्टे . पारशिवनी दिनांक १२/१२/२०२२ सोमवार सांयकाळी चे ६.०० वा . ते ६.३० वा . दरम्यान एका अल्पवयीन फिर्यादी / पीडिता वय १६ वर्षीय ही स्वतःची कास्ट सर्टीफीकेट बनविण्यासाठी रामटेक येथून पारशिवनी मार्गे पिकअप गाडीने स्वतःच्या गावी जात असतांना फिर्यादी ही गावाजवळील टि . पॉइंट जवळ पिकअप गाडीतून उतरून पायदळ स्वतःचे गावी जात असतांना यातील आरोपी नामे- शंकर सिरसाम , वय ३० वर्ष , रा . सावंगी ता . पारशिवनी याने फिर्यादीस शेतातील रस्त्याने शॉर्टकट जाता येईल असे सांगून फिर्यादीस कपासीच्या शेतात घेवुन गेला फिर्यादीची छेड काढुन तिचा विनयभंग केला फिर्यादीने आरोपीस विरोध करून आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने फिर्यादीचे तोंडात व चेहऱ्यावर माती टाकुन याबद्दल कोणाला काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली . या प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्टवरुन पो.स्टे . पारशिवनी येथे आरोपी विरुध्द कलम ३५४ ( ब ) , ३२३ , ५०६ भादंवी सहकलम ८ बाल लैगींक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे . आरोपीचा शोध घेणे सुरू आहे . गुन्हयाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक किरण घोडगे या करीत आहे .
@फाईल फोटो