नागपूर :- महानगरपालिका नागपूर, एचडीएफसी बॅक आणि अर्पण ब्लड बॅक यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार (ता. ९) रोजी नागपूर महानगरपालिका, आरोग्य विभाग येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबीराचे उद्घाटन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त राम जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांचे सहकार्य शिबीराला मिळाले. या उपक्रमाचे हे १४ वे वर्ष असुन भारतातील ११५० शहरांत असलेल्या ५५०० हुन अधिक केंद्रामध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर महानगरपालिकेतील आरोग्य विभागामध्ये महानगरपालिकेतील विविध अधिकारी/कर्मचारी यांनी सदर शिबीरामध्ये रक्तदान करुन शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या रक्तदान शिबीरामध्ये एकुण ७० अधिकारी / कर्मचारी यांचेमार्फत रक्तदान करण्यात आले. “रक्तदान हे श्रेष्ठदान ” या म्हणीप्रमाणे म.न.पा. नागपूर च्या विविध स्तरावरील लोकांनी रक्तदान करुन आपले कर्तव्य बजावले. एचडीएफसी बँकेतर्फे मेहुल शिर्के, रेणुका आंबेकर व गुरुप्रसाद राव यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या पार पडले. ब्लड बँकेतर्फे डॉ. पी. खेडीकर, डॉ. नकुल ठाकरे व अंकित सिंग बैस यांनी रक्तदान शिबीरात सहकार्य केले.
महापालिकेतील ७० अधिकारी कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान, एचडीएफसी बॅकेतर्फे रक्तदान शिबिर संपन्न
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com