विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्यासाठी कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम उपलब्ध होण्यासाठी सामंजस्य करार करणार
अमरावती :- महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपुर्वा पालकर यांनी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाला आज भेट दिली. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी त्यांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला. चर्चा करतांना त्या म्हणाल्या, महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाचे उपकेंद्र अमरावती येथे लवकरच सुरू करण्यात येणार आहे. उद्योगांच्या मागणीनुसार मनुष्यबळाची निर्मिती व्हावी, त्यासाठी आवश्यक कौशल्य प्राप्त करणारा विद्यार्थी तयार व्हावा म्हणून कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाशी सामंजस्य करार करुन पाचही जिल्ह्रांतील महाविद्यालयांव्दारे विद्याथ्र्यांना उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करणार आहे.
ऑन द जॉब ट्रेनिंग अभ्यासक्रमांतर्गत 40 टक्के प्रत्यक्ष शिकविणे व 60 टक्के प्रात्याक्षिक अशा प्रकारचे कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम विद्याथ्र्यांना उपलब्ध होणार आहेत. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने अशा प्रकारचे अभ्यासक्रम सर्व विद्याथ्र्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्या मार्गदर्शना खाली आम्ही पुढाकार घेणार असल्याचे आणि त्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे प्र-कुलगरू डॉ. विजयकुमार चौबे यांनी सांगितले. यावेळी कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, यांनी सुध्दा त्यांचेशी संवाद साधला. यावेळी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर, महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाचे अधिकारी सुध्दा उपस्थित होते.