संदीप बलवीर,प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचा उपक्रम
टाकळघाट :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व महाप्रज्ञा बुद्ध विहार यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि २८ नोव्हे ला दुपारी ५ ते सायं १० वाजेपर्यंत टाकळघाट डॉ बाबासाहेब आंबेडकर बस स्थानक चौकात संविधान दिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २६ नोव्हें १९४९ ला देशाला सर्वांग सुंदर असे संविधान देऊन समता, स्वतंत्र,न्याय व बंधुता हि चतसुत्री देऊन जगण्याचा सुंदर अवसर प्राप्त करून दिला.देशातील ८५% बहुजनांना आपले अधिकार व कर्तव्य काय? याची अमंल बजावणी कशी करायची हे सुद्धा संविधानातून सांगितले असतांना कुंभकर्णी निद्रेत असलेला बहुजन समाज संविधान प्राप्तीनंतर जागा झाला नाही.म्हणूनच त्यांना निद्रेतून जागे करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीने संविधान दिन महोत्सवाचे आयोजन केले आहे.
या संविधान दिन महोत्सवाचे प्रमुख अथीती म्हणून नागपूर ग्रामीणच्या पोलीस उपअधीक्षक पूजा गायकवाड,एम आय डी सी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अशोक कोळी,नागपूर जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेता आतिष उमरे,टाकळघाट ग्रा प च्या सरपंचा शारदा शिंगारे,उपसरपंच नरेश नरड,हिंगणा प स उपसभापती सुषमा कडू,माजी जी प सदस्य हरीचंद्र अवचट,ग्रा प सदस्य मनोज जिवने आदी मान्यवर उपस्थित राहतील.तर या कार्यक्रमाचे मुख्य प्रबोधनकार म्हणून महाराष्ट्राचे नामवंत राजकीय व सामाजिक अभ्यासक धम्मचारी प्रशिल आहे.तसेच दुपारी ५ ते ८ वाजता नरेश चिमनकर प्रस्तुत भीमगर्जना म्युजिकल ग्रुप यांचा आंबेडकरी गीतांचा जलसा राहील.तरी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान आयुष कारमोरे,परिवर्तन सूर्यवंशी,विशाल गोडघाटे,पवन सूर्यवंशी, राकेश भगत,सागर चारभे,मंगेश चंदनखेडे, बंटी भगत यांनी केले.