मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर सोमवार दि. 28 आणि मंगळवार दि. 29 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.
राज्यात गोवर आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यशासनाने तातडीच्या उपाय योजना सुरू केल्या आहेत. या आजाराचा वाढता प्रसार रोखण्यासाठी मुंबई महानगर पालिकेमार्फत प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून कशा प्रकारे नियोजन करण्यात आले आहे, शासनस्तरावर कोणती खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच लहान मुले व पालकांनी घ्यावयाची काळजी आदी विषयांची सविस्तर माहिती डॉ. गोमारे यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.