मोकाट श्वानांना अन्न खाऊ घालण्यासाठी नोंदणी अनिवार्य, ठिकाण, वेळ आणि श्वानांची संख्याही नोंदविणे आवश्यक

नागपूर :- नागपूर महानगरपालिका हद्दीमध्ये मोकाट श्वानांना अन्न खाऊ घालणारे नागरिक, प्राणीप्रेमी संस्था, संघटनांना आता मनपामध्ये अर्ज भरून नोंदणी करणे अनिवार्य आहे. मोकाट श्वानांना ज्या ठिकाणी अन्न खाऊ घालत आहे त्या ठिकाणाबाबत सविस्तर माहिती, अन्न खाऊ घालण्याची वेळ, अन्न खाऊ घालत असलेल्या मोकाट श्वानांची अंदाजित संख्या इत्यादी सविस्तर माहिती अर्जामध्ये नमूद करणे आवश्यक आहे, अशी सूचना मनपा उपायुक्त तथा घनकचरा विभागाचे संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी केली आहे.

मोकाट श्वानांना अन्न खाऊ घालणारे नागरिक तथा प्राणी प्रेमी संस्था आणि संघटनांनी पशुवैद्यकीय सेवा कक्ष, घनकचरा व्यवस्थापन विभाग, पाचवा माळा, नागपूर महानगरपालिका, सिव्हिल लाईन्स येथे अर्ज करावा. 15 दिवसांच्या आत संबंधितांनी मोकाट श्वानांना अन्न खाऊ घालत असलेल्या ठिकाणाबाबतची माहिती विभागाला सादर करावी. या माहितीच्या आधारे मा. सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेल्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिका हद्दीमध्ये मोकाट शहरांना अन्न खाऊ घालण्याचे ठिकाणे आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून निश्चित करण्यात येईल, असेही डॉ. महल्ले यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विनारॉयल्टी रेती वाहतुकीचा ट्रॅक्टर पकडला पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त : ‘ एल.सी.बी’ची पालोरा शिवारात यशस्वी कारवाई

Mon Nov 21 , 2022
पारशिवनी :- स्थानिक गुन्हे शाखेच्या ( एलसीबी ) पथकाने पारशिवनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पालोरा शिवारात रविवारी ( दि . २० ) दुपारी केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विनारॉयल्टी वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला . यात ५ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला , पोलिस सुत्राव्दारे अशी माहिती मिळाली की स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!