नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता.19) 09 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 1 लक्ष रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात नेहरुनगर, गांधीबाग आणि मंगलवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 25,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 12 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल नेहरुनगर झोन अंतर्गत वाठोडा चौक येथील रुबाब कलेक्शन या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोन अंतर्गत इतवारी मार्केट येथील विरेन्द्र ट्रेडर्स आणि क्वेटा कॉलनी येथील पटेल इन्फ्राटेक ट्रेडर्स या दुकानांविरुध्द कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मंगलवारी झोन अंतर्गत माऊंट रोड, सदर येथील विरास्वामी साऊथ इंडीयन रेस्टॉरेन्ट यांच्याविरुध्द कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.त्याचप्रमाणे हनुमाननगर झोन अंतर्गत प्रभाग न.32, शिर्डी नगर येथील शिवालया इन्फ्रास्ट्रक्चर यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोन अंतर्गत प्रभाग न.17, वंजारी नगर येथील Anandraj Constructions यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नेहरुनगर झोन अंतर्गत रमणा मारोती चौक येथील साईराम जेनेरिक मेडिकल स्टोअर्स यांच्याविरुध्द सामान्य कच-यासोबत जैव-वैद्यकीय कचरा फेकल्याबद्दल कारवाई करून 40 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोन अंतर्गत भोसले टब, तुळशीबाग येथील श्रीकांत इलेक्ट्रीकल्स यांच्याविरुध्द रस्त्यालगत मोठया प्रमाणात कचरा पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच सतरंजीपूरा झोन अंतर्गत प्रभाग न. 21, शितलामाता मंदीर येथील लांजेवार बिल्डर्स यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.