संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
विविध ठिक ठिकाणी मिरवणुकीचे जंगी स्वागत.
कन्हान : – इस्लाम धर्माचे प्रवर्तक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या वाढदिवसा निमित्य सुन्नी रजा मस्जिद पटेल नगर कन्हान येथे सर्व मुस्लिम बांधवांनी गळे मिळुन एकमेकांना जश्न -ए- ईद मिलादुन्नबी च्या शुभे च्छा देऊन परिसरात राष्ट्रीय महामार्गाने भव्य मिरवणु क काढुन शांततेत जश्न -ए- ईद मिलादुन्नबी उत्सव उत्साहाने थाटात साजरा करण्यात आला.
रविवार (दि.९) ऑक्टोंबर ला जश्न -ए- ईद मिला दुन्नबी उत्सवा निमित्य सुन्नी रजा मस्जिद पटेल नगर कन्हान येथे सर्व मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून पटेल नगर परिसरातुन भव्य मिरवणुक काढण्यात आली. ही मिरवणुक पिपरी, धरम नगर, अशोक नगर , आंबेडकर चौक, तारसा चौक, सात नंबर नाका, कांद्री वरून परत नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गाने भ्रमण करून गांधी चौक, मटन मार्केट होत सुन्नी रजा मस्जिद येथे मिरवणुकीचे समापन करण्यात आले. मिरवणु कीत मुस्लिम समाजाच्या विविध संघटनां सह शेकडो नागरिकांनी हातात झेंडे घेऊन सहभाग घेतला. या वेळी सर्वांनी बंधुता आणि एकात्मतेचा संदेश दिला .
हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या वाढदिवसा निमित्य राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी ही मिरवणूक काढण्यात आल्याचे अकरम कुरैशी यांनी सांगितले. मिरवणुकीचे विविध ठिक ठिकाणी फुलांच्या वर्षाने, बुंदी, शरबत, नास्ता आदी खाद्य पदार्थ वितरण करून भव्य स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी सुन्नी रजा मस्जिद पटेल नगर कन्हान येथे मिलाद पार्ट्या करून सलामी देऊन देशाच्या सुख आणि बंधुभावासाठी प्रार्थनाही करण्या त आली व सर्व मुस्लिम बांधवांनी गळे मिळुन एकमे कांना जश्न -ए- ईद मिलादुन्नबी च्या शुभेच्छा देऊन परिसरात उत्साहाने ईद उत्सव शांततेत थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी इमाम आफताब आलम, अब्दुल लतीफ, शेख अकरम कुरेशी, मोह शफीक शेख़ , फिरोज शेख, पप्पु मेराज खान, वहीद शेख, जाकिर , शाहिद रजा, रशीद , शादाब कुरेशी, नफीश खान, अनीस पठान, इसराइल खान, गौश मोहम्मद, लड्डू, आकिब सिद्धिकी, जलील , शाहरूख खान, सईद खान, सतीश शेख, शहिद खान, साफिक शेख, शादाब कुरैशी सह मुस्लिम बांधव बहु संख्येने उपस्थित होते.